६० स्थानकांत रुग्णवाहिकेची प्रतीक्षा 

तेजस वाघमारे  
शुक्रवार, 6 जुलै 2018

मुंबई - उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आजही मध्य रेल्वेच्या सुमारे ६० स्थानकांच्या परिसरात रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे उघड झाले आहे. परिणामी तिथे अपघात झाल्यानंतर खासगी रुग्णवाहिका पोहोचेपर्यंत रुग्ण ताटकळत राहतो. उल्हासनगर ते अंबरनाथ स्थानकांत होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. या मार्गातील अपघातांमध्ये तब्बल ४८ जणांचा मृत्यू झाला. 

रेल्वे अपघातातील जखमींना तत्काळ उपचार मिळावेत यासाठी रेल्वेस्थानकाबाहेर रुग्णवाहिका तैनात ठेवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. २०१४ पासून काही स्थानकांत याची अंमलबजावणी झाली; मात्र मध्य रेल्वेच्या ८८ स्थानकांपैकी फक्त २२ स्थानकांवरच रुग्णवाहिका तैनात आहे. राज्याच्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. ठाणे व डोंबिवली स्थानकांत खासगी रुग्णवाहिका तैनात आहेत. एक लाख लोकसंख्येसाठी एक रुग्णवाहिका अशा निकषानुसार ही योजना राबवली जात आहे. 

ज्या स्थानकांवर रुग्णवाहिका नाहीत त्या ठिकाणी अपघात झाल्यास दुसऱ्या स्थानकांतील रुग्णवाहिका मागवाव्या लागतात. मुंबईची वाहतूक कोंडी फोडून ती रुग्णवाहिका रुग्णालयात पोहोचेपर्यंत वेळ गेलेला असतो. 

रुग्णवाहिका नसलेली स्थानके
मुंब्रा, दिवा, कोपर, ठाकुर्ली, विठ्ठलवाडी, वांगणी, शेलू, नेरळ, भिवपुरी रोड, कर्जत, पळसदरी, केळवली, डोलवली, लोवजी, खोपोली, शहाड, आंबिवली, टिटवाळा, खडवली, वासिंद, आसनगाव, आटगाव, थानशेत, खर्डी, उंबरमाळी, कसारा, डॉकयार्ड रोड, किंग्ज सर्कल, जीटीबी नगर, चुनाभट्टी, टिळकनगर, सानपाडा, जुईनगर, नेरूळ, सीवूड-दारावे, सीबीडी बेलापूर, खारघर, मानसरोवर, खांदेश्‍वर, पनवेल, ऐरोली, रबाळे, घणसोली, कोपरखैरणे आणि तुर्भे.

Web Title: 60 ambulance stations waiting