मुंबईसाठी अतिरिक्त 600 मेगावॉट वीज

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

मुंबई - दरवर्षी उकाड्यात मुंबईतील विजेची मागणी वाढते; मात्र यंदा मुंबईसाठी अतिरिक्त 600 मेगावॉट विजेची तरतूद केली जाणार आहे. वीज पारेषण वाहिन्यांच्या विकासासाठी "मुंबई ट्रान्समिशन स्ट्रेटनिंग प्रोजेक्‍ट'चे काम 95 टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे मुंबईत जादा वीज वाहून आणणे सहज शक्‍य होणार आहे.

येत्या पंधरवड्यात संपूर्ण क्षमतेने या वाहिनीतून मुंबईसाठी वीज आणणे शक्‍य होईल, अशी माहिती महापारेषणमधील सूत्रांनी दिली. उन्हाळ्यात वाणिज्य आणि घरगुती ग्राहकांकडून एसीचा वापर वाढतो. त्यामुळे मुंबईतील विजेच्या मागणीत दरवर्षी भर पडते. ही मागणी सरासरी तीन हजार मेगावॉटवर पोहचत आहे. सकाळी मुंबईत सर्वाधिक विजेची मागणी आहे. उन्हाळ्यात या मागणीत 10 टक्‍क्‍यांची सरासरी भर पडण्याची शक्‍यता आहे. गतवर्षी तीन हजार 300 मेगावॉटपर्यंत मागणी पोहचली होती. मुंबई ट्रान्समिशन स्ट्रेटनिंग प्रकल्पाची मुदत आतापर्यंत अनेकवेळा वाढवण्यात आली आहे. त्यात रेल्वेच्या मेगाब्लॉकपासून पर्यावरण विभागाच्या परवानगीपर्यंत अनेक अडथळ्यांतून मार्ग काढत हा प्रकल्प पूर्णत्वास येत आहे. येत्या पंधरवड्यात या पारेषण वाहिन्या संपूर्ण क्षमतेने कार्यरत होणे अपेक्षित आहे.

Web Title: 600 megawatt electricity for mumbai