esakal | मुंबईत ६०० नवे रुग्ण ,एकूण संख्या ७,२६,६३७ इतकी
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुंबईत ६०० नवे रुग्ण ,एकूण संख्या ७,२६,६३७ इतकी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत (Mumbai) आज ६०० नवीन रुग्ण सापडले. मुंबईतील (Mumbai) कोरोनाग्रस्तांची (corona) एकूण संख्या ७,२६,६३७ इतकी झाली आहे. आज ५६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजवर ७, ००, ९७४ रुग्ण कोरोना (Covid) मुक्त झाले आहेत. आजवर ७४,६२,५५८ कोरोना (corona) चाचण्या झाल्या आहेत.

कोरोना रुग्णवाढीचा सरासरी दर ०.७ टक्के इतका आहे; तर रुग्ण दुपटीचा कालावधी ८९२ दिवसांवर गेला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन ७,७३१ हजारांवर आला आहे.

मुंबईत आज दिवसभरात १३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मुंबईतील मृतांचा आकडा १५ हजार ५९९ इतका झाला आहे. आज मृत झालेल्यांपैकी १० रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये ९ पुरुष, तर ४ महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ३ रुग्णाचे वय ४० आणि ६० च्या दरम्यान होते. तर १० रुग्णांचे वर ६० वर्षांच्या वर होते.

हेही वाचा: मुंबईत फूल बाजाराला बहर

धारावीत आज तीन रुग्ण आढळले. धारावीतील एकूण रुग्णांचा आकडा ६९१० आहे, तर धारावीत केवळ १९ रुग्ण उपचाराधीन आहेत. दादरमध्ये आज १० रुग्ण आढळले. धारावीतील एकूण रुग्णसंख्या ९,७३२ झाली आहे. माहीममध्ये आज ११ नवे रुग्ण सापडले. माहीममधील एकूण रुग्ण १०,०६२ झाले आहेत. ‘जी’ उत्तर मध्ये आज २४ नव्या रुग्णांची भर पडली. एकूण रुग्णांचा आकडा २६,७०४ झाला आहे.

loading image
go to top