तीन महापालिकांसाठी 62 टक्के मतदान

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 20 एप्रिल 2017

मुंबई - चंद्रपूर, परभणी व लातूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 62 टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी येथे दिली.

मुंबई - चंद्रपूर, परभणी व लातूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 62 टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी येथे दिली.

सहारिया यांनी सांगितले, की उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन या तिन्ही ठिकाणी सायंकाळी 5.30 ऐवजी 6.30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ वाढवून देण्यात आली होती. चंद्रपूर महापालिकेसाठी 57 टक्के, परभणी महापालिकेसाठी 70 टक्के, तर लातूर महापालिकेसाठी 60 टक्के मतदान झाले. त्याचबरोबर अकोला जिल्हा परिषदेच्या दानापूर निवडणूक विभागाच्या पोटनिवडणुकीसाठी 47.97 टक्के, तर अकोट (जि. अकोला) पंचायत समितीच्या कुटासा निर्वाचक गणाच्या पोटनिवडणुकीसाठी 50.18 टक्के मतदान झाले.

Web Title: 62% voting for municipal election