मुंबई विमानतळावर 63 लाखांचे सोने जप्त 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

मुंबई - मुंबई विमानतळावर दोन किलो सोन्यासह नुकतीच सौदी अरेबियाच्या नागरिकाला अटक करण्यात आली. गोया अहमद सिराज असे त्याचे नाव आहे. एअर इंटेलिजन्स युनिटने ही कारवाई केली. जप्त केलेल्या सोन्याची किंमत 63 लाख 71 हजार इतकी आहे. 

सिराज हा जेद्दा येथून तस्करीचे सोने घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. तो विमानतळावर येताच त्याची झडती घेण्यात आली. त्याच्या पॅण्टच्या खिशातील पाकिटात एक किलोचे दोन आणि 100 ग्रॅमचा एक बार सापडला. त्याला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने दोन किलो सोने त्याचे आहे, तर 100 ग्रॅम सोने त्याचा चुलत भाऊ फाहीद अली याचे असल्याचे सांगितले. सिराज हा आरोपी सौदी अरेबिया एअरलाइन्सच्या ग्राउंड स्टाफमध्ये कामाला आहे. 

Web Title: 63 lakh gold seized at Mumbai airport