Mumbai News : कर्करोगाला त्रासून वृध्द महिलेची आत्महत्या... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

64 year old woman committed suicide cancer health mumbai

Mumbai News : कर्करोगाला त्रासून वृध्द महिलेची आत्महत्या...

मुंबई : मुंबईच्या दादर पश्चिम भागात एका इमारतीच्या छतावरून उडी मारून एका वृध्द महिलेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. रोहिणी पाटील या 64 वर्षीय महिलेने बुधवारी आत्महत्या केली. मृत महिलेला कर्करोग झाला होता.

त्यामुळे मानसिकरित्या खचल्याने रोहिणी पाटील यांनी हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबत दादर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.रोहिणी पाटील यांच्यावर जानेवारीत शस्त्रक्रिया झाली होती.

संपूर्ण आयुष्य निरोगी जगल्यानंतर वयाच्या 64 व्या वर्षी कर्करोग झाल्यामुळे त्या मानसिक तणावाखाली होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून व नात असा परिवार आहे. रोहिणी रमेश पाटील त्या दादर पश्चिम येथील वर्तक हॉल समोरील साईकृपा इमारतीत कुटुंबासमवेत वास्तव्यास होत्या .

सात मजली साईकृपा इमारतीच्या गच्चीवर पाटील रोज सकाळी फेरफटका मारण्यासाठी जायच्या. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी त्या इमारतीच्या गच्चीवर गेल्या. त्यानंतर काही वेळाने इमारतीच्या खाली त्याचा मृतदेह सापडला. पाटील यांना कर्करोग झाला होता. त्यामुळे त्या मानसिक तणावाखाली होत्या. अनेक वेळा त्यांनी आजारपणाबाबत कुटुंबीयांकडे खंतही व्यक्त केली होती,

टॅग्स :policecrimewomen