
Nerul Plot : नवी मुंबईत जमिनीला हिऱ्याचा भाव! एक चौरस मीटर जागेसाठी 6.72 लाखांची बोली
नवी मुंबईत घर घेण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र आता शहरात घर घेणे सामान्य नागरिकांच्या अवाक्याबाहेर गेले आहे. अशीच एक माहिती समोर आली आहे. नवी मुंबईतील रिअल इस्टेट उद्योगाला फायद्याची मात्र घर घेणाऱ्या लोकांची डोकं दुखवणारी बातमी आहे.
पाम बीच रोड जवळील नेरुळमधील सिडकोच्या भूखंडाला प्रति चौरस मीटर ६ लाख ७२ हजार ६५१ इतकी विक्रमी बोली लागली आहे. ही बोली १,०४,३०१ प्रति चौरस मीटरच्या मूळ किमतीच्या सुमारे ६.५ पट आहे.
शहरातील मागील बोलीपेक्षा ही सर्वोच्च बोली आहे. ही बोली जवळपास १ लाख २० हजार प्रति वर्ग मिटर जास्त आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पाम बीच रोड प्लाॅटसाठी झालेल्या बोलीमध्ये ५ लाख ५४ हजार प्रति वर्ग मिटर लावण्यात आली होती.
या भागात सिमित जागा घेण्यासाठी लोकांची इच्छा तिव्र होत आहे. येथील जागेसाठी दुसरी सर्वात जास्त बोली देखील ५ लाख ५६ हजार प्रति वर्ग मिटर ऐवढी आहे.
नवी मुंबईतील बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष वसंत भद्र यांनी स्पष्ट केले की विजयी बोलीमध्ये अनेक विकासक एकत्र आले होते. ज्यामुळे खर्चाचा भार वाढण्यास मदत झाली.
४ हजार चौरस फूट कार्पेट क्षेत्रफळाच्या प्रीमियम फ्लॅटची मागणी मर्यादित आहे परंतु पुरवठ्याच्या कमतरतेमुळे आणि खाडीच्या दृश्यामुळे, किंमत जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.