भाड्याच्या आमिषाने 69 मोटारी पळविल्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 एप्रिल 2017

ठाणे - पंचतारांकित हॉटेलच्या नावाने खोटे करारनामे करून महिनाभरासाठी दीड लाख रुपये भाडे देण्याचे आमिष दाखवून मोटार घेऊन पलायन करणाऱ्या तीन आरोपींकडून पोलिसांनी 69 मोटारी जप्त केल्या आहेत. 

ठाणे - पंचतारांकित हॉटेलच्या नावाने खोटे करारनामे करून महिनाभरासाठी दीड लाख रुपये भाडे देण्याचे आमिष दाखवून मोटार घेऊन पलायन करणाऱ्या तीन आरोपींकडून पोलिसांनी 69 मोटारी जप्त केल्या आहेत. 

"ग्रॅण्ड हयात' हॉटेलमध्ये ग्राहकांच्या वाहतुकीसाठी मोटारी भाड्याने घ्यायच्या आहेत, असे सांगून तेथील वाहतूक व्यवस्थापक असल्याचा दावा करत तीन तरुणांनी ठाण्यातील सुमारे 69 जणांकडून गाड्या ताब्यात घेतल्या होत्या. महिन्याला दीड लाख रुपये नफा देण्याचे आश्‍वासन देऊन तसे करारनामे करून मोटारमालकांचा विश्‍वास या आरोपींनी जिंकला होता. मोटारमालकांकडून मोटारी भाड्याने लावण्याच्या नोंदणीसाठी 15 हजारांचे शुल्कही आकारण्यात आले होते. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अनुराग तिवारी (वय 40), रोहित घरत (29) आणि राजेंद्र यादव (35) यांना अटक करून 69 मोटारी जप्त केल्या आहेत. 

Web Title: 69 car rental bait has Reserved

टॅग्स