वांद्य्रात 70 लाखांच्या बनावट नोटा जप्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 एप्रिल 2017

मुंबई - दोन हजारच्या बनावट नोटा छापणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. आरोपींनी घरातच छापखाना सुरू केला होता.

मुंबई - दोन हजारच्या बनावट नोटा छापणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. आरोपींनी घरातच छापखाना सुरू केला होता.

त्यांच्याकडून 70 लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. दोन हजारांच्या तीन हजार 505 बनावट नोटा पोलिसांनी ताब्यात घेतल्या.
जतीन बाबू सोलंकी (वय 37), विजय कांबळे (39) आणि सचिन बन्सी (25) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील सोलंकी मुख्य आरोपी असून त्याच्याच घरात नोटा तयार केल्या जात होत्या, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. बनावट नोटा चलनात आणण्यासाठी हे तिघे वांद्य्रातील बॅण्ड स्टॅण्ड परिसरात येणार असल्याची माहिती कक्ष-9 चे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार, वांद्रे किल्ला परिसरात छापा घालून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे 70 लाख दहा हजारांच्या बनावट नोटा सापडल्या. रंगीत झेरॉक्‍स यंत्र आणि स्कॅनरच्या सहाय्याने या नोटा तयार करत असल्याची माहिती आरोपींनी चौकशीत दिली.

Web Title: 70 lakh duplicate currency seized