71 मंडळांना मंडप परवानगी नाही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 ऑगस्ट 2016

खड्ड्यांपोटीचा दंड न भरल्याने पालिकेचा निर्णय
मुंबई - सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी रस्त्यावर खोदलेल्या खड्ड्यांपोटीच्या दंडाची रक्कम कमी करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असतानाच, हा दंड न भरल्याने मुंबई पालिकेने तब्बल 71 मंडळांना मंडप बांधण्यासाठी परवानगी दिलेली नाही. गणेशोत्सव तोंडावर आला असताना अद्याप मंडप उभे न राहिल्याने या मंडळांपुढे पेच निर्माण झाला आहे.
 
गणेशोत्सवासाठी रस्त्यावर मंडप उभारण्याकरिता खोदण्यात येणाऱ्या प्रत्येक खड्ड्यासाठी महापालिका दोन हजार रुपयांचा दंड वसूल करते. त्यासाठी वर्षभर गणेशोत्सव मंडळांना नोटिसा बजावल्या जातात. मात्र, त्यापैकी किरकोळ दंडाची वसुली होते. आजवर तरीही न चुकता या मंडळांना मंडप उभारण्याची परवानगी मिळत असे. या दंडाची रक्कम कमी करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी शनिवारी दिले होते. मात्र पालिकेने दादर, धारावी परिसरातील मंडळांसह तब्बल 71 मंडळांना हा दंड भरण्याची नोटीस बजावत मंडप उभारण्याची परवानगी नाकारली आहे.

दरम्यान, खड्ड्यांपोटीचा दंड एक वर्षाने मागणे, त्यासाठी मंडप उभारण्याची परवानगी नाकारणे हा प्रकार योग्य नाही. तीन महिन्यांपासून महापालिका प्रशासनासोबत बैठका सुरू होत्या. तेव्हा याबाबत माहिती देण्यात आली नाही. आता दंड न भरल्याने मंडप उभारण्याची परवानगी नाकारली जात आहे, असे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ऍड. नरेश दहिबाकर यांनी सागितले. याबाबत महपौर स्नेहल आंबेकर आणि पालिका आयुक्त अजोय मेहता यांना पत्र लिहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: 71 circles are not permitted Booth