Mumbai Crime News : आर्थर रोड तुरुंगात कैद्याकडे सापडले 730 ग्रॅम सोने

26 जानेवारी रोजी मुंबईतील आर्थर रोड कारागृहात तपासणीदरम्यान एका आरोपीच्या पॅंटच्या खिशात 730 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन सापडली होती.
730 grams of gold found in Arthur Road Jail prisoner mumbai police crime
730 grams of gold found in Arthur Road Jail prisoner mumbai police crimeSakal

मुंबई : आर्थर रोड तुरुंगात कैद्याकडे सापडले 730 ग्रॅम सोने सापडल्याची घटना समोर आली आहे. 26 जानेवारी रोजी मुंबईतील आर्थर रोड कारागृहात तपासणीदरम्यान एका आरोपीच्या पॅंटच्या खिशात 730 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन सापडली होती.

ही साखळी जेलरने जप्त केली आहे. आरोपीला कस्टम अधिकाऱ्यांकडून अटक करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी या आरोपीला मुंबई विमानतळावरून अटक केली होती. त्यानंतर 26 जानेवारीला सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपीला न्यायालयाच्या आदेशानुसार आर्थर रोड कारागृहात पाठवले होते.

कारागृहात आल्यानंतर आरोपीची तपासणी सुरू असतानाच त्याच्या पॅंटच्या खिशातून सोनसाखळी सापडली. ही साखळी आरोपींना कारागृहात का घेऊन जात होती, याचा तपास सुरू आहे. या संदर्भात तुरुंग प्रशासनाने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com