पंचाहत्तरव्या स्वातंत्र्य दिनी पंचाहत्तर किलामिटरची 'शिल्प भिंत' साकारण्याचा मानस

संजीत वायंगणकर
सोमवार, 7 मे 2018

डोंबिवली - डोंबिवलीकर आर्ट सोसायटी तर्फे रविवारी 'कलास्पर्श' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डोंबिवलीकर कलारसिक दात्यांच्या सहाय्याने प्रमोद कांबळे यांना आठ लाख ऐंशी हजार रुपयांचा निधी सुपुर्द करण्यात आला. राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने झालेल्या या कार्यक्रमात कलाक्षेत्रातील दिग्गज कलाकारांनी आपली कला रंगमंचावर सादर करुन डोंबिवलीकरांकडून वाहवा मिळविली.

डोंबिवली - डोंबिवलीकर आर्ट सोसायटी तर्फे रविवारी 'कलास्पर्श' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डोंबिवलीकर कलारसिक दात्यांच्या सहाय्याने प्रमोद कांबळे यांना आठ लाख ऐंशी हजार रुपयांचा निधी सुपुर्द करण्यात आला. राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने झालेल्या या कार्यक्रमात कलाक्षेत्रातील दिग्गज कलाकारांनी आपली कला रंगमंचावर सादर करुन डोंबिवलीकरांकडून वाहवा मिळविली.

यावेळी प्रमोद कांबाळे बोलत होते. देशभरातल्या चित्र, शिल्प, नाट्य, नृत्य, गायन अशा कलेच्या सर्व क्षेत्रांना समावेशक अशी पंच्याहत्तर किलोमीटर लांबीची 'शिल्प भिंत' साकारण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्याचा मानस असल्याचे त्यांनी यावेऴी सांगितले. ही भिंत 2022मध्ये देशाच्या पंचाहत्तरव्या स्वातंत्र्य दिनी देशाला अर्पण करावयाची ईच्छा असल्याचे कांबळे यांनी सांगितले. हा प्रकल्प यशस्वीपणे पुर्णत्वास जाईल अशी खात्री आणि नवउर्जा आजच्या डोंबिवलीतील 'कलास्पर्श' कार्यक्रमाने मिळाली असे भावपूर्ण उद्गार शिल्पकार प्रमोद कांबाळे यांनी 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. 

ते पुढे म्हणाले, महिनाभरा पूर्वी दुर्घटनेनंतर आयुष्यात असा एक क्षण होता, तेव्हा वाटले होते सगळ संपल.. परंतू अनेकांनी दिलेल्या उभारीमुळे आणि आयुष्याकडे वळून पाहताना जाणवले की आत्ता तर खरी सुरुवात आहे. आजवर कलाकार म्हणून व्यावसायिक काम करुन खूप कमविले आता देशासाठी काही वेगळे करावयाचे आहे. देशाच्या पन्नासाव्या स्वातंत्र्य दिनी देशातल्या पाचशे कर्तृत्ववान देशवासीयांची पेन्सिल चित्रे सलग 70 मीटर कॅनव्हासवर रेखाटली होती. त्याच धर्तीवर या आगळ्यावेगळ्या 75 किलोमीटर शिल्प भिंतीची निर्मिती करावयाची आहे. या भिंतीवर कला क्षेत्रातील सर्वसमावेशक कलांवर आधारीत शिल्पे तयार करुन देशाला समर्पित करण्याची ईच्छा आहे.    

कार्यक्रमाची सुरुवात प्रमोद कांबळे यांनी डोंबिवलीचे आराध्यदैवत गणेश मंदिरातील गाणरायाची कॅनव्हासवर जणू अधिष्ठापना करुन केली. त्यानंतर रंगमंचावर एकाचवेळी सुलेखनकार अच्युत पालव, व्यंगचित्रकार निलेश जाधव, चित्रकार प्रकाश बाळ जोशी, निसर्ग चित्रकार निलेश भारती, व्यक्ती चित्रकार विशाल वाडवे, आणि शिल्पकार चंद्रजीत यादव यांनी आपआपल्या कलेचे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळेस प्रमोद कांबळे यांनी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांचे पेन्सिलीने व्यक्ती चित्र रेखाटले. ही प्रात्यक्षिके पाहताना डोंबिवलीकर रसिकांचे भान हरपले. 

तेवीस संस्था संघटना, सर्वच राजकीय पक्षातील मान्यवर पदाधिकारी व लोकप्रतिनिधी, कलाकारांनी साकारलेल्या अप्रतिम कलाकृतींची चांगली रक्कम देणाऱ्या दानशूर व्यक्ती तसेच समयसूचक अशा नृत्य व गायन या माध्यमातून झालेला स्थानिकांचा अविष्कार यामुळे डोंबिवलीकरांची झालेली कलाजगताची सफर नक्कीच हृदयस्पर्शी ठरली.

Web Title: 75 kilometer 'craft wall' to be built in Dombivli