८० शिवसैनिकांच्या हाती शेकापचा झेंडा! पक्षनेतृत्वावर नाराजी...

८० शिवसैनिकांच्या हाती शेकापचा झेंडा! लॉकडाऊन, चक्रीवादळ मदतीबाबत पक्षनेतृत्वावर नाराजी
८० शिवसैनिकांच्या हाती शेकापचा झेंडा! लॉकडाऊन, चक्रीवादळ मदतीबाबत पक्षनेतृत्वावर नाराजी

अलिबाग : शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यप्रणालीवर खूश होऊन रामराज येथील सुमारे 80 शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शेकापमध्ये प्रवेश केला. चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित कार्यकर्त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

लॉकडाऊन व चक्रीवादळाच्या कालावधीत शिवसेनेकडून नागरिकांकडे दुर्लक्ष झाल्याने नाराज होऊन रवींद्र अष्टावकर, राजेंद्र अष्टावकर, अंकुश अष्टावकर, सतीश दिवकर, रूपेश दिवकर, प्रभाकर दिवकर, रमन दिवकर, हेमंत दिवकर, विलास तुळसुनकर, शैलजा तुळसुनकर, शेखर तुळसुनकर, दिनेश सुभेकर, विश्वास अष्टावकर, संदीप वेटकोळी, सचिन वेटकोळी, प्रताप वेटकोळी, गणेश मुंडे, दीपक वेटकोळी, नरेश दिवकर, नरेश अष्टावकर, श्रीकांत चोरगे, जयवंत चोरगे, स्वस्तिक चोरगे, विक्रांत कोळी, मंदार कोळी, संतोष तुळसुनकर, प्रथमेश वेटकोळी आदी 80 तरुण, ज्येष्ठ कार्यकर्ते आणि महिलांनी  शेकापमध्ये प्रवेश केल्याचे शेकापकडून सांगण्यात आले.

या वेळी पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष वागळे, मदन शेळके, सरपंच हिराजी काष्टे, उपसरपंच गणेश धुमाळ, नितीन पालकर, अशोक खोत, नंदकुमार गावडे, नौशाद मुजावर, शैलेंद्र हाडकर, प्रवीण शिंदे, नथुराम वाघमारे, शरीक मुजावर, चंद्रकांत बामणे, युवा कार्यकर्ते विक्रांत वार्डे, संतोष झावरे, विनीत झावरे, सोहम वागळे आदी शेकाप कार्यकर्ते उपस्थित होते.
-----------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com