उल्हासनगरात डॉक्टरच्या एटीएममधून 80 हजार रुपये भुर्रर्र..!

दिनेश गोगी
बुधवार, 18 एप्रिल 2018

उल्हासनगर : पशुवैद्य असणाऱ्या एका डॉक्टरचे त्यांच्याच समक्ष एटीएम बदलण्याची हातचलाखी करण्याचा आणि त्यातून तब्बल 80 हजार रुपये भुर्रर्र केल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरात घडला आहे. कमालीचा हातचलाखीचा खेळ एका तरुणाने खेळला असून त्याच्या सोबत तीन महिला सोबती आहेत.

उल्हासनगर : पशुवैद्य असणाऱ्या एका डॉक्टरचे त्यांच्याच समक्ष एटीएम बदलण्याची हातचलाखी करण्याचा आणि त्यातून तब्बल 80 हजार रुपये भुर्रर्र केल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरात घडला आहे. कमालीचा हातचलाखीचा खेळ एका तरुणाने खेळला असून त्याच्या सोबत तीन महिला सोबती आहेत.

रजनीकांत गायकवाड हे पशुवैद्यकीय डॉक्टर असून त्यांचे एक्सिस बँकेत खाते आहे. परवा रात्री गायकवाड हे कॅम्प नंबर 5 मधील एक्सिस बँकेच्या एटीएममध्ये 10 हजार रुपये काढण्यासाठी गेले. कक्षात दोन एटीएम मशीन होती. एक मशीनवर तीन महिला रांगेत होत्या. तर दुसऱ्या मशीनवर असलेल्या एका इसमाने शंभरच्या 40 नोटा असे 4 हजार रुपये काढले. गायकवाड कक्षात गेल्यावर त्यांनी एटीएम कार्ड मशीनवर ठेवून 10 हजार रुपयांची संख्या टाकली. नोटा येत नसल्याने त्यांनी दुसऱ्यांदा प्रयत्न केला. पण तो देखील निष्पळ ठरला.

तितक्यात एक पंचवीशीतील तरुण आत आला. 'अंकल क्या हुआ,नोट नही आरही क्या? लाओ मै कोशिश करता हूँ' असे म्हणताच गायकवाड यांनी त्याच्याकडे एटीएम कार्ड सोपवले आणि गायकवाड त्याच्या मागे उभे राहिले.

तरुणाने प्रयत्न करण्याचा बनाव करून अंकल एटीएम मशीनसे रिस्पॉन्स नही मिल रहा है,असे म्हणत एटीएम गायकवाड याच्या हातात दिले आणि तो तरुण आणि तीन महिला एकत्र बाहेर पडल्या.

एक्सिस बँकेच्या दुसऱ्या एटीएम मधून रुपये काढण्यासाठी गायकवाड निघाले. मात्र काही मिनिटातच त्यांच्या मोबाईलवर तब्बल 80 हजार रुपये काढले काढले गेल्याचे मॅसेज येऊ लागले. एटीएम कार्ड तर माझ्याकडे मग रुपये कसे निघाले याविचाराने गायकवाड यांनी एटीएम बघितले असता, ते डुप्लिकेट एटीएम असल्याचे त्यांच्या लक्षात आहे. त्या तरुणाने हातचलाखी दाखवत एटीएम बदलून रुपये काढल्याने रजनीकांत गायकवाड यांनी हिललाईन पोलीस ठाणे गाठून अनोळखी तरुणाची तक्रार दाखल केली आहे. तो तरुण आणि तीन महिला सोबत असल्याची शक्यता रजनीकांत गायकवाड यांनी व्यक्त केली.

Web Title: 80 thousand looted from ATM in Ulhasnagar