टाटा स्काय कंपनीची 84 लाखांची फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

मुंबई - टाटा स्काय कंपनीच्या इलेक्‍ट्रॉनिक व्हाऊचरद्वारे 84 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी तिघांना नुकतीच हरियानातून अटक केली. शम्मीकुमार अरोरा (29), गुरप्रित खेरा (28) आणि मनप्रित खेरा (24) अशी त्यांची नावे आहेत. हे तिघेही हरियानातील फतेहाबाद येथील रहिवासी आहेत. बनावट डीलर दाखवून विक्री न झालेले एक कोटी 11 लाखांचे इलेक्‍ट्रॉनिक व्हाऊचर पुनर्प्राप्त झाल्याचे दाखवून ही फसवणूक करण्यात आली. 

टाटा स्काय कंपनीने देशातील विविध भागांमध्ये "डिस्ट्रीब्यूटर' नेमले होते. त्याप्रमाणे आरोपीच्या हरियानातील लक्ष्मी कंपनीचीही डिस्ट्रीब्यूटर म्हणून नेमणूक केली होती. डीलर कंपनीला टाटाकडे भरलेल्या रक्कम व कमिशन मिळून होणाऱ्या रकमेचे इलेक्‍ट्रॉनिक व्हाऊचर मिळतात. त्याबाबत व्यवहारासाठी संगणक प्रणालीत लॉग इन ही मिळते. त्यानुसार आरोपींच्या लक्ष्मी डीटीएच कंपनीला 27 लाख 23 हजारांचे इलेक्‍ट्रॉनिक व्हाऊचर प्राप्त झाले होते. आरोपींनी त्यांच्या परिसरात बनावट डीलरना त्यांना मिळालेले 27 लाख 23 हजारांचे इलेक्‍ट्रॉनिक व्हाऊचर विकल्याचे संगणक यंत्रणेत दाखवले. पण संगणक यंत्रणेत इलेक्‍ट्रॉनिक व्हाऊचर पुनर्प्राप्त झाल्यास रक्कम रिफंडची व्यवस्था आहे. आरोपींनी याच यंत्रणेचा वापर करून एकच इलेक्‍ट्रॉनिक व्हाऊचर अनेक वेळा पुनर्प्राप्त झाल्याचे दाखवून एक कोटी 11 लाख रुपयांचे व्हाऊचर पुनर्प्राप्त झाल्याचे दाखवले. याबाबतची माहिती कंपनीला मिळाल्यानंतर टाटा स्कायच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक सुनील चावला यांनी ना. म. जोशी मार्ग पोलिसांकडे गेल्या वर्षी तक्रार केली होती. या घटनेचा तपास करताना आरोपींचा सहभाग आढळल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. 

Web Title: 84 lakh cheating of Tata Sky Company