87 टक्के सरबत, बर्फाचे गोळे घातक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 एप्रिल 2019

बर्फाचे गोळे; उसाचा रस पिण्याचा मोह होतो. पण, ही सरबते आणि गोळे आजारास निमंत्रण देऊ शकतात. ते बनवण्यासाठी वापरला जाणारा बर्फ आणि पाण्यात आरोग्यास घातक असलेला ई-कोलाय विषाणू असल्याचे मुंबई पालिकेने नुकत्याच केलेल्या पाहणीत उघड झाले.

मुंबई -  काहिलीवर उतारा म्हणून अनेकांना रस्त्यावर विकली जाणारी सरबते, बर्फाचे गोळे; उसाचा रस पिण्याचा मोह होतो. पण, ही सरबते आणि गोळे आजारास निमंत्रण देऊ शकतात. ते बनवण्यासाठी वापरला जाणारा बर्फ आणि पाण्यात आरोग्यास घातक असलेला ई-कोलाय विषाणू असल्याचे मुंबई पालिकेने नुकत्याच केलेल्या पाहणीत उघड झाले. कुर्ला रेल्वेस्थानकात दूषित पाण्यापासून लिंबू सरबत बनवला जात असल्याबाबतचा व्हिडीयो व्हायरल झाल्यानंतर पालिकेने मुंबईभर ही तपासणी केली. त्यासाठी पालिकेच्या पथकाने घेतलेल्या बर्फाच्या 595 पैकी 519 नमुन्यांमध्ये (87 टक्के) हा घातक विषाणू आढळला. 

सध्या मुंबईतील किमान तापमान सरासरी 33 अंश सेल्सिअस आहे. उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी अनेक नागरिक रस्त्यावर विकली जाणारी सरबते, बर्फाचे गोळे खाण्यास प्राधान्य देत आहेत. मात्र, ते बनवण्यासाठी वापरला जाणारा बर्फ दूषित पाण्यापासून तयार केला जातो. सरबतांसाठी अनेक विक्रेते शौचालयांतील किंवा चोरी करून मिळवलेले दूषित पाणी वापरतात. सरबते बनवण्यासाठी वापरली जाणारी भांडी, भांडी स्वच्छ करण्यासाठी वापरले जाणारे पाणीही दूषित असते. या सर्व गोष्टी आरोग्यसाठी हानीकारक आहेत. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी रस्त्यावर मिळणारी सरबते, बर्फाचे गोळे खाऊ नयेत, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. 

तपासणीसाठी घेतलेले नमुने ः 596 
प्रकार...नमुने... घातक नमुने 
बर्फ ः156 ...141 
लिंबू सरबत ...204...157 
उसाचा रस...236 ...221 

घातक ई-कोलाय 
- ई-कोलाय विषाणूमुळे पचनसंस्थेवर विपरित परिणाम होतो. 
- ई-कोलाय असलेले सरबत प्यायल्यास अतिसाराचा त्रास होऊ शकतो. 
- ई-कोलायमुळे विषबाधाही होऊ शकते. 

Web Title: 87 percent of syrup, ice balls are deanger