ड्रग्ज विक्रीप्रकरणी 9 नायजेरियनला अटक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जुलै 2018

मुंबई : अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या 9 नायजेरियनला शुक्रवारी (ता.27) रात्री अमली पदार्थविरोधी कक्षच्या (एएनसी) पोलिसांनी गजाआड केले. चार्ल्स ईझिया, ओकोरो आजा, मॅसेल्स डिनो, सॅम्युअल ओकेनी, केन ईशमेल, कोपी रोमालिक, चिकू फ्राय, नन्ना अग्वू, जोकू पायस अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून कोकेन, एमडीसह दोन चाकू जप्त करण्यात आले. न्यायालयाने सर्वांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 

जे. जे. मार्ग पोलिस ठाण्याच्या हदीत दहा दिवसांपूर्वी गस्तीवर असलेल्या पोलिसांवर हल्ला झाला होता. त्यात पोलिस जखमी झाले होते. तस्करांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी तेथे पोलिसांनी अधिक गस्त वाढवली होती. कारवाईदरम्यान मुंबई पोर्ट ट्रस्ट रोड, फ्री वे पुलाखाली काही संशयित नायजेरियन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांना पाहता त्यांनी पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. त्यावेळी आरोपींनी पोलिसांशी हुज्जत घातली.

पोलिसांनी त्यांच्याकडून साडेपाच लाख रुपयांचे कोकेन आणि 18 हजारांचे एमडी ड्रग्ज जप्त केले. अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी त्या सर्वांविरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी विरार, मालवणी, अंधेरी, दिवा, नालासोपारा, सांताक्रूझ परिसरात राहतात. रात्रीच्या वेळेस ते अमली पदार्थ विक्रीकरता दक्षिण मुंबईत येतात. अटक आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. 

Web Title: 9 Nigerian arrested in drug sales