मेट्रो 2-ए चे 90 टक्के काम पूर्ण 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

मुंबई : मेट्रो 2-ए (दहिसर ते डी. एन. नगर व्हाया लिंक रोड)चे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) जुलै 2020 मध्ये ट्रायल होणार आहे; परंतु शेवटच्या टप्प्यात आणखी 304 झाडांवर कुऱ्हाड चालविली जाणार आहे. के पश्‍चिम (31 झाडे), आर उत्तर ( 70 झाडे), तर लालजीपाडा, महावीर नगर, कांदिवली पश्‍चिम (53 झाडे) कापली जाणार आहेत. टप्प्याटप्प्याने हे काम सुरू राहणार असून, यातील काही झाडांचे पुनर्रोपणही केले जाणार असल्याचे एमएमआरडीएने सांगितले. 

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या साह्याने एमएमआरडीए मुंबई मेट्रो 2-ए चे काम करत आहे. हे काम 2019 च्या मध्यापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यानंतर डिसेंबर 2019 पर्यंत ही सेवा सुरू करण्याचा प्राथमिक अंदाज होता; परंतु काही तांत्रिक कारणास्तव मेट्रोचे काम रेंगाळले. आता मात्र या कामाने वेग घेतला असून, मेट्रो 2-ए चे काम अंतिम टप्प्यात पोहचले आहे. अंतिम टप्प्यात होणारी वृक्षतोडीबाबत आक्षेप आणि हरकती नोंदविता येणार आहेत. भायखळा राणीबाग येथील उद्यान अधीक्षकांच्या कार्यालयात याबाबत सुनावणी होणार आहे. मेट्रोच्या डबे बनवण्याचे कंत्राट बीईएमएल लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने तयार केलेला पहिला मेट्रो 2- ए चा डबा मुंबईत लवकरच दाखल होणार आहे. 

मेट्रो 2-ए साठी एमएमआरडीए अंतर्गत एकूण 19 एजन्सी काम करत आहेत. त्यामुळे एखाद्या कामासाठी चार-पाच महिने उशीर होणे स्वाभाविक आहे. 2020 मध्ये ही मेट्रो 2-ए सेवा सुरू करण्याचे एमएमआरडीएने जाहीर केले आहे. थोड्याशा उशिराच्या फरकाने ही सेवा मुंबईकरांसाठी सुरू होईल, असा विश्‍वास आहे. 
- आर. ए. राजीव, आयुक्त, एमएमआरडीए. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 90% of Metro 2-A's completed in mumbai