सिडको करणार 90 हजार घरांची निर्मिती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 डिसेंबर 2018

नवी मुंबई : सर्वसामान्यांनाही स्वत:च्या मालकीचे हक्काचे घर असावे यासाठी सिडको आगामी काळात 90 हजार घरांची निर्मिती करणार आहे. मागास आणि अल्प उत्पन्न गटातील ही घरे असून सिडकोच्या या महाकाय योजनेचा शुभारंभ मंगळवारी (ता. 18) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. विशेष म्हणजे ही सर्व घरे शहरांतील मध्यवर्ती भागात उभारण्यात येणार असून रेल्वेस्थानकापासून जवळ, वाहन पार्किंग अशा विविध सुविधांनी युक्त असतील, अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली. 

नुकत्याच ऑगस्ट महिन्यात पार पडलेल्या सिडकोच्या 15 हजार घरांच्या सोडतीसाठी तब्बल दोन लाखांहून अधिक अर्ज आले. हे लक्षात घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खारकोपर-नेरूळ लोकल सेवेच्या शुभारंभाप्रसंगी सिडकोने नवी मुंबईतील रेल्वे, बस स्थानके आदी परिसरांसह शहरातील पार्किंगच्या जागा, ट्रक टर्मिनल, फूड कोर्टच्या जागा अशा शहरातील मध्यवर्ती भागांत एक लाख घरांच्या निर्मितीचे काम हाती घेण्याच्या सूचना सिडको व्यवस्थापनाला दिल्या होत्या. त्यानुसार सिडकोने नवी मुंबईतील मोकळ्या भूखंडांचा अभ्यास करून त्या ठिकाणी अडीच एफएसआयच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 89 हजार 771 घरांच्या निर्मितीची योजना हाती घेतली आहे. 

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी घरे 

या योजनेत जवळपास 53483 हजार घरे ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी, तर उर्वरित जवळपास 36,288 हजार घरे अल्प उत्पन्न गटासाठी उभारण्यात येणार आहेत. सर्वांसाठी घरे (हाऊसिंग फॉर ऑल) या शिर्षकांतर्गत सदर घरांची निर्मिती खारघर, कळंबोली, नवीन पनवेल येथील बस टर्मिनल, तर वाशी आणि कळंबोली येथील ट्रक टर्मिनल, तसेच सानपाडा, जुईनगर, खारघर, बामणडोगरी, खारकोपर, मानसरोवर आणि खांदेश्‍वर या रेल्वेस्थानकांतील फोरकोर्ट एरिया अशा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी होणार आहेत. 

Web Title: 90 thousand houses to be constructed by CIDCO