मुंबईत 90,089 रुग्ण कोरोनामुक्त.... तर 970 नवीन रुग्णांची भर, वाचा सविस्तर आकडेवारी

मुंबईत 90,089 रुग्ण कोरोनामुक्त.... तर 970 नवीन रुग्णांची भर, वाचा सविस्तर आकडेवारी


मुंबई : मुंबईत आज रुग्णांची संख्या हजाराच्या खाली असून आज 970 नवीन कोरोना बाधित आढळले.त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 1,17,421 झाली आहे. तर आज 46 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 6,490 वर पोचला आहे. मुंबईत आज 1,790 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 76 टक्के इतका आहे.                                

मुंबईत आज नोंद झालेल्या 46 मृत्यूंपैकी 23 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 29 पुरुष तर 17 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या रुग्णांपैकी दोघांचे वय 40 च्या खाली होतेे. तर 30 रुग्ण 60 वर्षा वरील होते तर 14 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते.                   

मुंबई संशयित रुग्ण आढळणे सुरूच असून आज एकूण 754 नवे संशयित रुग्ण सापडले असून आतापर्यंत 83,199 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज 1,790  रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत 90,089 रुग्णांना घरी सोडण्यात आले. 

मुंबईत रुग्ण दुपटीचा दर हा 78 दिवसांवर गेला आहे. तर 2 जुलै पर्यंत एकूूूण 5,51,994  कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर  27 जुलै ते 2 ऑगस्ट जुलै दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर हा 0.89 इतका आहे. 

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com