मंत्र्यांची निवासस्थाने, रेल्वेनंतर पोलिस विभागही डिफॉल्टर यादीत

DGoffice Mumbai
DGoffice Mumbai

मुंबई : मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला, मंत्र्यांची निवासस्थाने, रेल्वे यांनी महापालिकेची कोट्यवधींची पाणी देयके थकवल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता पोलिस विभागाने पाण्याची तब्बल 93 कोटी 85 लाख 79 हजार 151 रुपयांचे देयक थकवल्याची माहिती आरटीआयमधून समोर आली आहे. त्यामुळे सदर पोलिस विभागाचा देखील पालिकेने डिफॉल्टर यादीत समावेश केला आहे. 

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महानगरपालिकेकडून पाण्याच्या थकबाकीदारांची माहिती मागवली होती. त्यानुसार पोलिस विभागाकडे तब्बल 93 कोटी 85 लाख 79 हजार 151 रुपयांची थकबाकी आहे. तसेच पोलिस विभागाचे एकूण 466 जलजोडणीला डिफॉल्टर यादीत टाकले आहे. यामध्ये मुंबई पोलिस आयुक्त मुख्यालय, पोलिस निदेशक कार्यालय, अनेक पोलिस उपआयुक्त, सहायक आयुक्त, पोलिस ठाणे, जीआरपी, वाहतूक पोलिस कार्यालय आणि पोलिस वसाहतींचाही समावेश आहे.  

यापूर्वी मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांवर पाण्याची एकूण 8 कोटींची थकबाकी होती. तसेच सदर निवासस्थानांना पालिकेने डिफॉल्टर यादीत टाकले होते. यावर सर्वच स्तरातून टीका झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागांनी जवळपास सर्व थकबाकीच्या पैशांचा भरणा मनपाकडे केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com