उल्हासनगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतली फटाके विरहित दिवाळीची शपथ

950 students of Ulhasnagarpalika school took the oath of without Fireworks diwali
950 students of Ulhasnagarpalika school took the oath of without Fireworks diwali

उल्हासनगर : विद्यार्थी आणि फटाके हे आनंद साजरे करणारं नात. पण फटक्यांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी या नात्याचा त्याग करणाऱ्या उल्हासनगर पालिकेच्या शाळा क्र.28 च्या 950 विद्यार्थ्यांनी फटाके विरहित दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली. त्यांनी रॅलीद्वारे जनजागृती केली आहे. बच्चेकंपनी असतानाही या विद्यार्थ्यांनी फटाकेबाजीचा विरोध करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे उल्हासनगरात कौतुक केले जात आहे.

शाळेतील शिक्षक विनोद सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांनी दिवाळीत वायूप्रदूषण व ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी किंबहुना टाळण्यासाठी 'फटाके विरहित प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प' मुख्याध्यापक राजकुमार शर्मा,शिक्षक विद्यार्थी यांच्या बैठकीत मांडला. या नावीन्यपूर्ण उपक्रमाला सर्वांनी दाद दिली आणि आज शनिवारी 950 विद्यार्थ्यांनी दिवाळीत आईवडिलांकडे फटाक्यांचा आग्रह धरायचा नाही,फटाकेच विकत घ्यायचे नाहीत,फटाके फोडायचेच नाही असा निर्धार घेतलेल्या शपथेतून घेतला.फटाक्यातून जे रुपये खर्च होणार होते, त्या वाचलेल्या रुपयातून पुस्तके विकत घेणे, किल्ले तयार करणे, निरनिराळे छंद जोपासणे, पर्यटन करणे, अनाथ आश्रमास भेट देण्याच्या पर्यायाला प्राधान्य देण्यात आले.

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीसाठी सध्या उल्हासनगर सज्ज झाले आहे. पण गेल्या काही वर्षांपासून दिवाळीदरम्यान वाढलेल्या फटक्यांच्या वापरामुळे प्रदूषणाचे प्रमाणही वाढले आहे. या वाढत्या प्रदूषणामुळे उल्हासनगरकरांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वाढते प्रदूषण कमी करण्याचे प्रमुख आव्हान सगळ्यांसमोर आहे. त्यामुळे याप्रकरणी विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी शाळेच्या वतीने हा प्रयत्न केला गेला.  

विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती झाल्यास प्रदूषणाचे प्रमाण नक्कीच कमी होईल, असा विश्वास मुख्याध्यापक राजकुमार शर्मा,विजय कांबळे,विनोद सूर्यवंशी यांनी व्यक्त केला. या प्रबोधनात्मक उपक्रमाचे आयुक्त अच्युत हांगे,प्रशासनाधिकारी भाऊराव मोहिते, शिक्षण मंडळाच्या लेखापाल निलम कदम-बोडारे आदींनी कौतुक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com