97 वे नाट्यसंमेलन उस्मानाबादमध्ये

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जानेवारी 2017

मुंबई - यंदा 7 ते 9 एप्रिलला होणारे 97 वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन उस्मानाबाद येथे होणार आहे. नाट्य परिषदेच्या वतीने शनिवारी ही घोषणा करण्यात आली. संमेलन भरवण्यासाठी परिषदेच्या नागपूर, कोल्हापूर, जळगाव, उस्मानाबाद तसेच मुक्ताईनगर येथील शाखांकडून प्रस्ताव आले होते; पण उस्मानाबादचे पारडे पहिल्यापासूनच जड समजले जात होते. निवड समितीनेही त्यावर शिक्कामोर्तब केले. ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन होईल. गेल्या वर्षी गंगाराम गवाणकर यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे शहरात नाट्यसंमेलन झाले होते.
Web Title: 97th natyasammelan in osmanabad