मुंबई : मुलुंडमध्ये अंगावर भिंत कोसळून एक जण ठार

पावसामुळं संरक्षक भिंत एका घरावर पडून ही दुर्घटना घडली
dead body
dead body

मुंबईत पावसामुळं गेल्या आठवड्यात इमारत पडल्याच्या दोन घटना घडल्या होत्या. यामध्ये एकूण ११ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, आज (गुरुवार) मुलुंड पश्चिम येथे पावसामुळे एक भिंत कोसळल्याची घटना घडली असून यामध्ये एकाचा मृ्त्यू झाला आहे. एएआयनं याबाबत वृत्त दिलं आहे. (A man succumbed to injuries after a wall collapsed on him in Mumbai Mulund)

सुत्रांच्या माहितीनुसार, दिलीप वर्मा (वय ३५) असं अंगावर भिंत कोसळून मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. मुलुंड पश्चिम येथे कंपाऊंडची भिंत घरावर पडून आज संध्याकाळी ही दुर्घटना घडली.

dead body
Corona Update : राज्यात दिवसभरात ९,८३० कोरोना रुग्णांची नोंद

दरम्यान, मालाड येथे बेकायदा इमारत पडून ११ जणांचा मृत्यू झाल्याची घटना आठवडाभरापूर्वी घडली आहे. त्यानंतर आज मुलूंड पश्‍चिमेला कालपादेवी पाडा येथील कंपाऊंडची भिंत घरावर पडून दिलीप वर्मा जखमी झाले होते. त्यांना मुलुंड येथील महानगर पालिकेच्या अग्रवाल रुग्णालयात दाखल केले मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

dead body
"मराठा आरक्षणप्रकरणी आठवड्याभरात पुनर्विचार याचिका दाखल करणार"

पावसाळ्यात मुंबईत दरवर्षीच इमारती, संरक्षक भिंती, झाडं पडून नागरिकांचे जीव जाण्याच्या घटना घडत असतात. यंदा जून महिन्यातच या दुर्घटना घडू लागल्या आहेत. सतत पावसाची रिपरीप सुरु असल्याने आज संध्याकाळी ही भिंत बाजूच्या घरावर पडून ही दुर्घटना घडली. जून महिन्यात हा १२ वा बळी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com