अवयव प्रत्यारोपणाला "आधार' 

नेत्वा धुरी
बुधवार, 30 मे 2018

मुंबई  - अवयव प्रत्यारोपणासाठीही आधार कार्ड बंधनकारक होण्याची शक्‍यता आहे. अवयवदान आणि प्रत्यारोपणाची प्रक्रिया सुलभ करण्याबरोबरच ओळख स्पष्ट करण्यासाठी आधार कार्ड हा चांगला पर्याय असल्याने हा विचार पुढे आला आहे. 

मुंबई  - अवयव प्रत्यारोपणासाठीही आधार कार्ड बंधनकारक होण्याची शक्‍यता आहे. अवयवदान आणि प्रत्यारोपणाची प्रक्रिया सुलभ करण्याबरोबरच ओळख स्पष्ट करण्यासाठी आधार कार्ड हा चांगला पर्याय असल्याने हा विचार पुढे आला आहे. 

अवयव प्रत्यारोपणासाठी दहा विविध प्रकारच्या कागदपत्रांची आवश्‍यकता असते. त्यातील एकाही कागदपत्राबाबत संशय आल्यास खासगी रुग्णालय हे प्रकरण थेट राज्य वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचनालयाकडे पाठवले. त्यात बराच वेळ खर्च होतो. यावर उपाय म्हणून रिजनल ऑर्गन एण्ड टिश्‍यूज ट्रान्सप्लान्ट ऑर्गनायझेशनने (रॉटो) ही प्रक्रिया सुटसुटीत आणि खात्रीलायक करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी राज्य सरकारच्या मदतीने नवे धोरण ठरवले जात आहे. काही दिवसांपूर्वी यासंदर्भात पहिली बैठक झाली आहे. या वेळी महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, डीएमईआर आणि राज्याच्या आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

बैठकीत दहा वेगवेगळ्या कागदपत्रांच्या तपासणीऐवजी एकच खात्रीलायक पुरावा घेण्याचा पर्याय पुढे आला. त्यात आधार कार्ड हा सर्वोत्तम पर्याय असल्याबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. विद्यमान कायद्यात कशाप्रकारे सुधारणा करता येईल. याबाबत लॉ युनिव्हर्सिटीने मसुदा तयार करावा, अशी शिफारसही करण्यात आली आहे. त्यामुळे हा मुसदा तयार करण्याचे काम लवकरच सुरू होण्याची शक्‍यता आहे. 

अंतिम मंजुरी दिल्लीत 
राष्ट्रीय ऑर्गन एण्ड टिश्‍यूज ट्रान्सप्लान्ट ऑर्गनायझेशन या देश पातळीवरील संस्थेची परवानगी मिळाल्यानंतर हा मसुदा देशभरात लागू होईल. विधी विद्यापीठाचे कुलगुरू हा मसुदा राज्य सरकारच्या रुग्णालयात प्रमुख सर्जन आणि रोटोला देतील. त्यांनी सुचवलेल्या बदलांसह हा मसुदा केंद्रीय संस्थेकडे पाठवला जाईल. 

अवयव प्रत्यारोपणाच्या परवानगीची प्रक्रिया सुटसुटीत करण्यासाठी काही पर्यायांवर विचार करण्यात आला आहे. त्यात आधार कार्डचाही पर्याय होता. 
डॉ. प्रवीण शिनगारे, संचालक डीएमईआर 

सध्या आवश्‍यक असलेली कागदपत्रे 
- रेशन कार्ड, पॅन कार्ड, आयकरपत्र, मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र, शाळेचा दाखला, रक्तगट समान असल्याचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला. 

Web Title: Aadhaar card being compulsory for organ transplantation