'आधार' सुविधा केंद्र एक मार्चपर्यंत बंद

'आधार' सुविधा केंद्र एक मार्चपर्यंत बंद

घोटी : महाराष्ट्रातील आधार सुविधा केंद्र येत्या एक मार्चपर्यंत बंद ठेवण्याची सूचना "युनिक आयडेंटीफिकेशन ऍथोरिटी ऑफ इंडिया'कडून "आधार' केंद्र संचालकांना प्राप्त झाली आहे. त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.

"आधार' सॉफ्टवेअर अद्ययावत करण्यात येणार असल्याने त्याच्या तांत्रिक बाबी पूर्ण होईपर्यंत राज्यातील "आधार' सुविधा केंद्रांसह बॅंक, पोस्ट ऑफिस कार्यालयातील "आधार'चे कामकाजही बंद ठेवण्यात येणार आहे. शासनाच्या विविध योजनांसाठी शेतकरी, कामगार, नोकरदार आदींना आधार लिंक करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.

तसेच, विद्यार्थ्यांनाही 28 फेब्रुवारी ही शिष्यवृत्ती फार्म भरण्याची अंतिम तारीख असल्याने आधार केंद्र लवकरात लवकर सुरू न झाल्यास अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com