आदित्य ठाकरे कॉंग्रेस हायकमांडच्या भेटीला दिल्लीत; डॉ. मनमोहन सिंहांचे देखील घेतले आशीर्वाद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्रात उद्या उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. अशातच आज उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांनी दहा जनपथवर जाऊन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली.

शपथविधी सोहळ्याचं त्यांनी सोनिया गांधींना निमंत्रण दिलं. या नंतर माध्यमांशी बोलताना आम्ही सोनिया गांधी यांना शपथविधीसाठी निमंत्रण दिलंय आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहोत असं सांगितलंय.  

Image may contain: 2 people, people smiling, people standing and indoor

Image may contain: 3 people, people standing, people sitting and indoor

यानंतर आदित्य ठाकरे यांनी भारताचे माजी पंतप्रधान आणि कॉंग्रेसचे जेष्ठ नेते डॉक्टर मनमोहन सिंह यांची देखील भेट घेतली. डॉक्टर मनमोहन सिंह यांना आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीचं निमंत्रण दिलं आहे.  

Image may contain: 3 people, people smiling, people standing

आदित्य ठाकरे यांनी कॉंग्रेस हायकमांड सोनिया गांधी आणि डॉक्टर मनमोहन सिह यांच्या भेटीनंतर भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची देखील भेट घेतल्याचं बोललं जातंय. लालकृष्ण अडवाणी यांना आदित्य ठाकरे यांनी शपथविधीचं निमंत्रण दिल्याचं सूत्रांकडून समजतंय.

दरम्यान या भेटीनंतर आदित्य ठाकरे पुन्हा मुंबईकडे रवाना झालेत.

Webtitle : aaditya thackeray met sonia gandhi and dr manmohan singh at delhi  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aaditya thackeray met sonia gandhi and dr manmohan singh at delhi