कर्जतमध्‍ये आदिवासींनी घडविले संस्‍कृतीचे दर्शन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

नेरळ येथे सुरू झालेली ही रॅली कर्जत रस्त्याने कर्जत शहरात गेली आणि तेथून मुरबाड रस्त्याने कशेळे येथे पोहोचली. दरम्यान, सर्व ठिकाणी आदिवासी समाजाने आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविले.

मुंबई : कर्जत तालुका आदिवासी संघटनेच्या वतीने आदिवासी दिनानिमित्त बाईक रॅली काढण्यात आली. नेरळ येथे सुरू झालेली ही रॅली कर्जत रस्त्याने कर्जत शहरात गेली आणि तेथून मुरबाड रस्त्याने कशेळे येथे पोहोचली. दरम्यान, सर्व ठिकाणी आदिवासी समाजाने आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविले.

कर्जत तालुक्‍यात गेली चार वर्षे सह्याद्री आदिवासी ठाकूर-कातकरी आदिवासी संघटनेच्या वतीने आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन आयोजित करण्यात आला होता. नेरळ येथील कोतवालवाडीमध्ये बाईक रॅलीला सुरुवात झाली, त्यानंतर नेरळ गावातून ही बाईक रॅली पुढे माथेरान रस्त्याने हुतात्मा चौकात पोहोचली. हुतात्मा चौकात हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार घालून आदिवासी समाजाने अभिवादन केले. त्यावेळी हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने आदिवासी बाईक रॅलीचे स्वागत करण्यात आले. 

संघटनेचे अध्यक्ष भरत शिंदे, उपाध्यक्ष परशुराम दरवडा, मंगळ केवारी, खजिनदार बुधाजी हिंदोळा, सचिव मोतीराम पादीर, महिला अध्यक्ष रेवती ढोले; तसेच माजी अध्यक्ष जैतु पारधी, मालू निर्गुडे, जिल्हा परिषद सदस्य अनसूया पादीर, कर्जत पंचायत समिती सदस्य जयवंती हिंदोळा, माजी सरपंच दादा पादीर, जे. के. पिरकड आदी उपस्थित होते.

नेरळ येथून आदिवासी बाईक रॅली कर्जत रस्त्याने कर्जत येथे पोहोचली. त्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात तहसीलदार अविनाश कोष्टी, नायब तहसीलदार संजय भालेराव, निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी निवेदन स्वीकारले. त्यानंतर बाईक रॅलीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. 

त्या वेळी आदिवासी समाजाच्या महिलांनी तेथे पारंपरिक नृत्य सादर केले. पुढे कर्जत शहरातून ही रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पोहोचली. तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर कर्जत शहरातून ही बाईक रॅली मुरबाड रस्त्याने कडाव येथे पोहोचली. 

कर्जत येथे आमदार सुरेश लाड, कर्जतच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, माजी नगराध्यक्ष राजेश लाड यांनी आदिवासी बाईक रॅलीमध्ये सहभाग नोंदविला. कशेळे येथे बाईक रॅलीचा समारोप झाला. त्या वेळी रायगड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण समिती सभापती नारायण डामसे, रेखा दिसले, सुरेखा हरपुडे, सरपंच हर्षला राणे यांनी शुभेच्छा दिल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aadivashi culture festival in Karjat, Mumbai