"झोमॅटो गोल्ड'वर "आहार'चा बहिष्कार 

"झोमॅटो गोल्ड'वर "आहार'चा बहिष्कार 

मुंबई : इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने (आहार) झोमॅटोच्या "गोल्डन' डिलिव्हरी सेवेवर बहिष्कार टाकला आहे. या संदर्भात नुकतीच "आहार'च्या सदस्यांची बैठक मालाड येथे झाली. 

झोमॅटोच्या या योजनेचा लाभ हॉटेल व्यावसायिकांना होणार नसून, केवळ फूड ऍग्रिगेटर कंपन्यांना होणार आहे. म्हणूनच या योजनेवर "आहार'च्या 300 सदस्यांनी बहिष्कार टाकला आहे, असे संघटनेचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी सांगितले. "आहार'च्या सर्व 8000 सदस्यांनी झोमॅटोच्या "गोल्डन' योजनेवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन त्यांनी बैठकीत केले. आम्ही सुरुवातीपासूनच या योजनेच्या विरोधात होतो.

एक महिन्यापूर्वी झालेल्या बैठकीतही आम्ही विरोध केला होता; परंतु झोमॅटोने भूमिका स्पष्ट केली नाही व फूड ऍग्रिगेटरवर कारवाई केली नाही. त्यामुळे या योजनेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला, असे शेट्टी म्हणाले. 
 

web title : aahar boycott zomato gold

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com