महाड तालुक्यातील आकले गावाला मिळालीय विशेष ओळख; गणेशोत्सवातील पूजेला लागणाऱ्या सुपांचे गाव म्हणून परिचित

सुनील पाटकर
Sunday, 16 August 2020

रायगडच्या महाड तालुक्यातील आकले हे गाव पारंपारिक सुपे तयार करण्यासाठी ओळखले जाते. येथील सूपे रायगड जिल्हा प्रमाणेच रत्नागिरी, मुंबई, पुणे व बडोदा या भागांमध्ये विक्रीसाठी जातात.

महाड : गणेशोत्सवात गणपतीच्या पूजेसाठी तसेच ओवशासाठी सुपांना मोठी मागणी असते. सध्या बाजारात विविध प्रकारची सुप उपलब्ध असली तर पारंपारिक पद्धतीने विणलेल्या सुपांनी विशेष महत्वाचे स्थान आहे. महाड तालुक्यातील आकले गावामध्ये गौरी-गणपती सणानिमित्त घरोघरी सुपे तयार करण्याची लगबग सुरु झाली आहे. आकले गावातील सुप्यांना कोकणासह मुंबई, पु्ण्यात मोठी मागणी असते. 

...अन् स्वातंत्र्यदिनी पाटोळ ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण थांबली; जलजीवन मिशनद्वारे थेट नळजोडणी

रायगडच्या महाड तालुक्यातील आकले हे गाव पारंपारिक सुपे तयार करण्यासाठी ओळखले जाते. येथील सूपे रायगड जिल्हा प्रमाणेच रत्नागिरी, मुंबई, पुणे व बडोदा या भागांमध्ये विक्रीसाठी जातात. आकले गावातील बुरुड समाज सुपे, आसने, दुरडी, हारे, परडी, टोपल्या वर्षभर तयार करत असतात. परंतु गणेशोत्सवात हा व्यवसाय भरभराटीस येतो. या गावातील तीसहून अधिक कुटुंब हा व्यवसाय करतात. सुपांमध्ये वेगवेगळ्या आकाराची तसेच एकेरी, दुहेरी, रूमानी, कात्री, फुलवटी आणि नवघटी अशा वीणकाम प्रकारची सूपे तयार करून विक्रीसाठी पाठवली जातात. एका बांबूच्या काठी पासून 4 ते 5 सुपे तयार केली जातात. 

हरित लवादाचा बड्या कंपन्यांना जबरजस्त दणका; या कारणांमुळे ठोठावला कोटींचा दंड

आकले गावातील सुपे हाताने तयार केली जात असल्याने एका दिवसात तीन ते चार सुपे एक व्यक्ती तयार करतो. हाताने बनवल्यामुळे या सुपांना विशेष ओळख मिळाली आहे. सध्या बाजारामध्ये आकले गावचे सूप दीडशे ते दोनशे रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना चांगला रोजगार मिळाला आहे. तरीही बांबूचा तुटवडा आणि प्लास्टिकच्या सुपांचे झालेल्या अतिक्रमणामुळे या पारंपारिक व्यवसायालाही आव्हानाला सामोरे जावे लागत आहे. 

निसर्ग नंतर मासेमारीला पुन्हा वादळाचा तडाखा; नव्या हंगामाचा मुहुर्त लांबला; अद्याप मासेमारी नौका बंदरातच

बांबू विकास महामंडळाकडून नव्या पिढीला हा व्यवसाय टिकून राहावा आणि ही कला कायम राहावी तसेच बांबू व्यवसायातील नवनवीन कला अवगत करण्यासाठी प्रशिक्षण मिळावे, अशी येथील कारागीरांची अपेक्षा आहे. या व्यवसायासाठी योग्य दरात कर्ज पुरवठा झाल्यास व्यवसाय वाढवता येऊ शकेल, असे आकले येथील कारागीर शैलेश माने यांनी सांगितले.
----
संपादन ः ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aakale village of mahad taluka is popularly known for supa used for ganesh pooja