esakal | सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सवाबाबत अंबरनाथ पालिकेने घेतला महत्वपूर्ण निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

ganpati

राज्य शासनाच्या  निर्देशानुसार शहरात साजऱ्या होणाऱ्या सार्वजनिक आणि घरगुती   गणेशोत्सवाबाबत अंबरनाथ पालिका प्रशासनाने नियम लागू केले आहेत.

सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सवाबाबत अंबरनाथ पालिकेने घेतला महत्वपूर्ण निर्णय

sakal_logo
By
श्रीकांत खाडे

अंबरनाथ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आदेशानुसार गणेशोत्सव   साजरा करताना सार्वजनिक मंडळांनी  गणेश मूर्ती चार फुटी तर घरगुती गणेश मूर्ती दोन फुटांची असावी अशe  सूचना अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात  आल्या  आहेत. 

मोठी बातमी - गेल्या वर्षीही तेच झालं होतं, यंदाही तेच ! स्वीटी खेळताना घराबाहेर गेली आणि आई वडिलांना मिळाला मृतदेह

राज्य शासनाच्या  निर्देशानुसार शहरात साजऱ्या होणाऱ्या सार्वजनिक आणि घरगुती   गणेशोत्सवाबाबत अंबरनाथ पालिका प्रशासनाने नियम लागू केले आहेत. शहरांमधील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना यावर्षी पालिका प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक  करण्यात आले  आहे. त्याच बरोबर सर्व सार्वजनिक मंडळांना गणेशमूर्ती चार  फुटांची आणि घरगुती गणेशमूर्ती ही दोन  फुटांची असावी अशी अट घालून देण्यात आली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गर्दी जमेल अशा पद्धतीची सजावट  न करता  साध्या पद्धतीने सजावट करावी.

मोठी बातमी - पाणीपुरी, भेळपुरीच्या गाड्या खुणावतायत ? मसाला डोसे आठवतायत ? थांबा, आधी ही बातमी वाचा

गणेशोत्सवादरम्यान मंडळांकडून रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे यांसारखे उपक्रम राबवावे. त्याच बरोबर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये साथींच्या रोगांविषयी, स्वच्छतेविषयी जनजागृती करावी. मंडळांमध्ये आरती, भजन इत्यादींकरिता होणारी गर्दी  टाळावी. गणपती दर्शन ऑनलाइन, केबल नेटवर्क, फेसबुक इत्यादी माध्यमांद्वारे करण्यावर  भर द्यावा. गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरण, नागरिकांचे थर्मल स्कॅनिंगची व्यवस्था करावी. शारीरिक अंतराच्या नियमांचे  उल्लंघन होणार नाही याबाबत लक्ष  द्यावे.

महत्त्वाची बातमी -  सुशांत सिंह राजपूत प्रकरणी CBI कडे चौकशी गेल्यानंतर आज शरद पवारांनी केलं ट्विट, म्हणालेत...

घरगुती गणेशोत्सव साजरा करताना नागरिकांनी घरातील धातू किंवा संगमरवरी मूर्तीचे पूजन करावे किंवा शाडूच्या मूर्तीची स्थापना करावी. यामुळे  मूर्तीचे विसर्जन घरीच  करता येईल. गणेश आगमनाच्या आणि विसर्जनाच्या मिरवणुकांवर  देखील निर्बंध घालण्यात आले आहेत. लहान मुलांनी आणि जेष्ठ नागरिकांनी विसर्जनस्थळी जाणे टाळावे. ️एकाच विसर्जनस्थळी गर्दी होऊ नये म्हणून नगरपालिकेमार्फत मोरिवली शाळेजवळ, राहुल इस्टेट, ग्रीन सिटी, शिवगंगानगर, मोहनपूरम,  नेहरू गार्डन, कोहोजगाव येथे दोन कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे.त्याच ठिकाणी गणेश मूर्तीचे विसर्जन करावे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबरोबरच नागरिकांनीही  मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. असे आवाहन पालिका प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

(संपादन : वैभव गाटे)

aambarnath muncipal corporation take decision about ganesha festivel

loading image
go to top