‘...आणि काशिनाथ घाणेकर’ला प्राईम टाईम

Kashinath-Ghanekar
Kashinath-Ghanekar

मुंबई - शिवसेना आणि मनसेने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर ‘... आणि काशिनाथ घाणेकर’ या मराठी चित्रपटाला प्राईम टाईम देण्यास नकार देणारी चित्रपटगृहे; तसेच मल्टिप्लेक्‍सचालकांना शनिवारी नमते घ्यावे लागले. रविवारपासून या चित्रपटाला प्राईम टाईम देण्याची तयारी आता मल्टिप्लेक्‍सचालकांनी दर्शवली आहे. त्‍यामुळे सेना-मनसेच्‍या आंदोलनाला यश आले आहे.

रसिकांची पसंती मिळत असलेल्या या चित्रपटास सिंगल स्क्रीन चित्रपटगृहे; तसेच मल्टिप्लेक्‍समध्ये प्राईम टाईम मिळत नसल्याच्या तक्रारी ठाणे, कल्याण परिसरातून येत होत्या. या चित्रपटास प्राईम टाईम न मिळाल्यास खळ्ळ खट्ट्याक आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला. त्यानंतर नमते घेत रविवारपासून या चित्रपटाच्या खेळांची संख्या वाढवण्याचे; तसेच चित्रपटास प्राईम टाईम देण्याचे आश्‍वासन दिले. 
दादर-हिंदमाता येथील गोल्ड चित्रपटगृहातही या चित्रपटाला प्राईम टाईम न मिळाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर सेनेच्या चित्रपट सेनेचे चिटणीस बाळा लोकरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. आंदोलनानंतर चित्रपटगृहाच्या मालकाने या चित्रपटाचे खेळ वाढवण्याचे; तसेच प्राईम टाईम देण्याचे आश्‍वासन दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com