पर्यावरण विभागाकडून 'स्टॉप वर्क' नोटीस; मंत्री आदित्य ठाकरे यांनी आरेबाबत उघडकीस आणली धक्कादायक माहिती

सुमित बागुल
Saturday, 17 October 2020

महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आरेबाबत एक धक्कादायक गोष्ट उघडकीस आलीये.

मुंबई : महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आरेबाबत एक धक्कादायक गोष्ट उघडकीस आलीये. एकीकडे आरे मधील मेट्रो कारशेड कामांना स्थगिती देण्यात आलेली आहे. मुंबई मेट्रो तीनचं कारशेड हे आता कांजूरमार्गमध्ये हलवण्यात येणार आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतची माहिती दिलेली. असं असलं तरीही आरेमध्ये काही भागांमध्ये अजूनही काम सुरु असल्याची माहिती मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.  

पर्यावरच्या रक्षणासाठी मुंबईतील मेट्रो कारशेड हे कांजूरमार्गला हलवण्यात आलं. अशातही आरेमध्ये काही भागात अजूनही झाडे तोडली जात असल्याची माहिती वृक्षप्रेमी आणि स्थानिक नागरिकांना मिळाली होती. हे सर्व फोटो पर्यावरण प्रेमींनी मंत्री आदित्य ठाकरेंना पाठवले होते. याचबाबत आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून माहिती शेअर केली आहे. 

महत्त्वाची बातमी फडणवीसांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, केवळ घोषणा नको, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

आदित्य ठाकरेंनी आरेमधील धक्कादायक प्रकार ट्विटवरच्या माध्यमातून उघड करत याप्रकरणी चौकशी करण्यास सुरवात केलीये. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काम थांबवण्याची नोटीस पाठवून याबाबतचा अहवाल देखील मागावलाय. एकीकडे स्वतः मुख्यमंत्र्यांनी आरेतील कारशेड कांजूरमार्गमध्ये हलवण्याची घोषणा केली होती. मात्र त्यानंतरही आरेमध्ये अशा प्रकारची वृक्षतोड सुरु असल्याची धक्कादायक बाब आता समोर आलीये.    

aarey carshed project closed but work still continues in some parts aaditya thackeray tweets

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aarey carshed project closed but work still continues in some parts aaditya thackeray tweets