#AareyForest : ओंडके हटवल्यानंतर बांधकाम होणार सुरू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

गोरेगाव येथील आरे वसाहतीतील मेट्रो कारशेडचे बांधकाम सुरू करण्यासाठी अवघी ४४ झाडे तोडण्याचे काम बाकी आहे. आतापर्यंत तोडलेल्या २१४१ झाडांचे ओंडके हटवण्याचे काम सोमवारी सुरू होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर कारशेडच्या बांधकामाला सुरवात होईल, असे मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून सांगण्यात आले. आरे वसाहतीच्या परिसरात सोमवारीही संचारबंदी लागू होती. दिवसभर ओंडके कापण्याचे काम सुरू असल्यामुळे तणाव कायम होता.

‘आरे’तील कारशेडच्या जागेवर अवघी ४४ झाडे शिल्लक
मुंबई - गोरेगाव येथील आरे वसाहतीतील मेट्रो कारशेडचे बांधकाम सुरू करण्यासाठी अवघी ४४ झाडे तोडण्याचे काम बाकी आहे. आतापर्यंत तोडलेल्या २१४१ झाडांचे ओंडके हटवण्याचे काम सोमवारी सुरू होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर कारशेडच्या बांधकामाला सुरवात होईल, असे मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून सांगण्यात आले. आरे वसाहतीच्या परिसरात सोमवारीही संचारबंदी लागू होती. दिवसभर ओंडके कापण्याचे काम सुरू असल्यामुळे तणाव कायम होता.

पोलिसांनी आरे वसाहतीत येणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी केली होती. चौकशी करूनच नागरिकांना प्रवेश दिला जात होता. वृक्षतोडीनंतर आरे वसाहतीत प्रचंड तणाव निर्माण झाला होता, त्यामुळे पोलिसांनी शनिवारी या भागात जमावबंदी लागू केली; रविवारी रात्री काही काळासाठी ती शिथिल करण्यात आली. परंतु, सोमवारी पहाटेपासून जमावबंदी पुन्हा लागू करण्यात आली. तेथील काम बंदोबस्तात सुरू होते. महापालिकेने मेट्रोच्या कारशेडसाठी २१८५ झाडे तोडण्याची परवानगी दिली होती. सोमवारी सकाळपर्यंत २१४१ झाडे तोडण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aarey Forest Cutting Construction Carshade