Mumbai : मुंबईत २२७ वॉर्डमध्ये शिवजयंतीला आरतीचा जयघोष

भाजप मुंबईत ३४६ ठिकाणी शिवजयंती साजरी करणार
Ashish Shelar
Ashish Shelaresakal

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393 व्या जयंती निमित्त 19 फेब्रुवारीला मुंबईत भाजपा तर्फे 227 वॉर्डमध्ये शिवजयंती कार्यक्रम होणार आहेत. आघाडी व मोर्चे मिळून 346 ठिकाणी शिवजयंती साजरी केली जाणार आहे.

या जयंतीच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील आरतीचा महा जयघोष करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मान सोहळयात आमच्या राजकीय विरोधकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार ॲड आशिष शेलार यांनी केले राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर भाजपातर्फे दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्र,‍

दिवाळी उत्सव जोरदार साजरे करण्यात आले त्याचप्रमाणे आता ‍ छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीही मोठया उत्साहात मुंबईत साजरी करण्यात येणार आहे. या निमित्त मुंबईत प्रत्येक वॉर्डमध्ये नाक्यानाक्यावर जयंती उत्सव साजरा करण्यात येणार असून प्रत्येक ‍ठिकाणी जय जय शिवराया... या वि.दा. सावरकर यांनी लिहिलेल्या आरतीचा जयघोष करुन सावरकरांचाही सन्मान करण्यात येणार आहे.

मुंबईत होणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उलघडून दाखवणारे देखावे, चित्रप्रदर्शन, शिवव्याख्याने, गरिबांना विविध स्वरुपात मदत, महाराष्ट्राच्या लोकधारेतील सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, शाहिरी कार्यक्रम, विविध स्पर्धा, मिरवणुका, भव्य देखावे, किल्ले दर्शन,

शस्त्र प्रदर्शन, अशा विविध कार्यक्रमांनी मुंबई दुमदुमून जाणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातून प्रेरणा घेऊनभारतीय नौदलाचे नवे बोधचिन्ह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आले असून त्याची माहिती ही आम्ही जनतेपर्यंत पोहचवणार आहोत, असेही शेलार म्हणाले.

मराठेशाहीच्या इतिहासात मोठे महत्व असलेल्या आग्र्याच्या किल्ल्यात शिवजयंती उत्सव साजरा करण्यास परवानगी दिल्याबद्दल आमदार ॲड आशिष शेलार यांनी केंद्रातील मोदी सरकारचे अभिनंदन केले.

काँग्रेसची गरिबांच्या प्रति मानसिकता दिसून येते

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी बेताल वक्तव्य करताना त्यांनी पान टपरीवाल्यासारखे भाषण केले असा उल्लेख केला. काँग्रेसकडून कधी चहावाल्यांची, कधी पान टपरीवाल्यांचे खिल्ली उडवली जाते तेही समाजाचे घटक आहेत, यातून काँग्रेसची सर्वसामान्य माणसाविषयीची आणि गरिबांच्या प्रति असलेली मानसिकता दिसून येते.

रोहित पवार यांना राजकीय कावीळ

आमदार रोहित पवार यांनी ट्विटर वरून केलेल्या टिकेला उत्तर देताना आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, ज्यांना कावीळ झाली आहे त्यांना सगळे जग पिवळ दिसतं. एकंदरीत परिस्थिती पाहता रोहित पवार यांना राजकीय कावीळ झाली आहे.

सत्ता गेल्याने राऊतांची फडफड

खासदार संजय राऊत यांनी एकप्रकारे उद्धव ठाकरे औरंगाबादचे नामांतर करण्यात अपयशी ठरल्याचे मान्य केले आहे. संजय राऊत यांचा दुतोंडी भूमिका घेण्यात विश्वविक्रम आहे. उस्मानाबादचे धाराशिव करण्याची पहिली मंजुरी केंद्र सरकारने दिली होती. औरंगाबादचेही लवकरच नामांतर होईल. सत्ता गेल्यामुळे संजय राऊत यांची फडफड सुरू आहे, असे प्रत्युत्तर शेलारांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com