आशा भोसलेंच्या बंगल्याचे वीजबिल 80 हजार

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 7 डिसेंबर 2016

मुंबई - ख्यातनाम गायिका आशा भोसले यांच्या लोणावळा येथील बंगल्याचे वीजबिल हे वापराविना 80 हजारच्या दरम्यान आल्याने त्यासंदर्भात चौकशी केली जाणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

लोणावळ्यातील तुंगार्ली तलाव रस्त्यावर आशा भोसले यांचा बंगला आहे. येथे त्यांचे फार कमी वास्तव्य असते व त्यामुळे विजेचा वापर देखील मर्यादित आहे. तरीदेखील वीजबिल हे 50 ते 80 हजार एवढे अवाजवी आल्याने याबाबत चौकशी करण्याची मागणी आशा भोसले यांनी आमदार आशिष शेलार यांच्याकडे केली होती. तक्रारीची दखल घेत बावनकुळे यांनी महावितरणचे पुणे येथील मुख्य अभियंता मुंडे यांना तत्काळ चौकशी करण्याचा आदेश दिला.

Web Title: aasha bhosale bunglow electricity bill is eighty thousand