भिवंडीतून अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

शहरातील कामतघर परिसरातील पल्लवी नगर येथे राहणारी एक १७ वर्षीय कॉलेज युवती अचानक बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

भिवंडी : शहरातील कामतघर परिसरातील पल्लवी नगर येथे राहणारी एक १७ वर्षीय कॉलेज युवती अचानक बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी न्यायालयाच्या निर्देशानुसार अपहरणाची नोंद केली आहे.
पायल सुंदरराव सहजराव (१७ ) असे बेपत्ता झालेल्या युवतीचे नाव आहे.

ही तरुणी भिवंडीतील एका महाविद्यालयात अकरावीत शिकत होती. पायल कॉलेजमधून रात्री उशिरापर्यंत घरी परतली नाही. त्यामुळे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तिचे अपहरण केले असावे, या भीतीने तिची आई सुनीता सहजराव यांनी नारपोली पोलिस ठाण्यात धाव घेऊनमुलीच्या अपहरणाची तक्रार देत नोंद केली आहे. पायल ही अंगाने मध्यम असून उंची ४ फूट ५ इंच, चेहरा गोल, सरळ नाक, डोळे काळे आहेत. अंगात निळा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट असा कॉलेजचा युनिफॉर्म तिच्याअंगावर आहे.

 अशा वर्णनाची युवती कोणाला आढळल्यास त्याबाबत नारपोली पोलिस ( ०२५२२ - २३१२५०) ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस उपनिरीक्षक पराग भाट यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abduction of minor student from Bhiwandi