esakal | आदित्य ठाकरेंच्या विरोधात अभिजीत बिचुकले...
sakal

बोलून बातमी शोधा

Aditya Thackeray - Abhijeet Bichukale

शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेकडून वरळी मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांना कवी मनाचे नेते आणि बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातील चर्चित स्पर्धक अभिजीत बिचुकले आव्हान देणार आहे.

आदित्य ठाकरेंच्या विरोधात अभिजीत बिचुकले...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेकडून वरळी मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांना कवी मनाचे नेते आणि बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातील चर्चित स्पर्धक अभिजीत बिचुकले आव्हान देणार आहे. बिचुकले यांनी आज (शुक्रवार) वरळी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी (ता. 3) दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, 'मी सर्व शिवसैनिक आणि जनतेचा आभारी आहे. महाराष्ट्रासोबत वरळीचा विकास हेच माझे उद्दिष्ट आहे. मुख्यमंत्र्यांनी फोनद्वारे मला शुभेच्छा दिल्या आहेत.'

वरळीमधून बिचुकले हे अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार असल्याने ठाकरे विरुद्ध बिचुकले अशी रंगत होणार आहे. दरम्यान, अभिजीत बिचुकले साताऱ्यातूनही विधानसभा निवडणूक लढवणार आहे. भाजपचे उमेदवार शिवेंद्रराजे यांच्याविरोधात बिचुकले लढणार आहे. तर त्याची पत्नी अलंकृता बिचुकले या उदयनराजे भोसले यांच्या विरोधात लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार आहेत.

कोण आहे अभिजीत बिचुकले?
- साताऱ्यात अभिजीत बिचुकलेचा जन्म झाला
- घरात धार्मिक वातावरण, ज्योतिष हा पारंपरिक व्यवसाय
- बिचुकले सातारा नगरपालिकेचे कर्मचारी होते. पण, सुट्ट्यांच्या कारणावरुन 6 वर्षांपूर्वी राजीनामा दिला
- बिचुकले यांनी उपजीविकेसाठी गाण्यांचे शो, ऑर्केस्ट्राचं आयोजन केले.
- प्रत्येक निवडणुकीत ते उमेदवारी जाहीर करतात.
- उदयनराजेंविरोधात त्याने अनेकदा खासदारकीही लढवली. मात्र, दोन हजार मतंही त्यांना मिळाली नाहीत.
- यंदा त्यांनी राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्जही भरला होता.
- बिचुकलेंवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

कोण आहेत आदित्य ठाकरे?
- शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू.
- शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव.
- शिवसेना नेते व युवासेना प्रमुख.
- वय - 29
- शिक्षण - बीए, कायद्याचा पदवीधर
- धंदा - व्यवसाय

संपत्ती 11 कोटी 38 लाखांवर

  • बॅंक ठेवी - 10 कोटी 36 लाख
  • बॉन्ड शेअर्स- 20 लाख 39 हजार
  • वाहन - BMW मोटार
  • Mh -09 Cb -1234
  • किंमत - 6 लाख 50 हजार
  • दागिने- 64 लाख 65 हजार
  • इतर - 10 लाख 22 हजार
  • एकूण - 11 कोटी 38 लाख
loading image