मोदींचे 'भाषण' हेच 'शासन'..!

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 27 मे 2018

मुंबई : ''केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण होत असताना केवळ आश्‍वासनांची खैरात करत 'मेरा भाषण ही मेरा शासन' असा थेट संदेश मोदी यांनी दिला आहे. या चार वर्षांत केवळ जुमलेबाजी करतच सरकारचे कौतुक करण्यावर भर दिला गेला आहे,'' अशी टीका कॉंग्रेसचे नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी केली. 

मुंबई कॉंग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी कॉंग्रेसने मोदी सरकारच्या चार वर्षांतील घोषणा व त्यांची अंमलबजावणी याबाबत 'जुमला किंग' या सोशल मीडियातल्या सीरिजची सुरवात सिंघवी यांच्या हस्ते केली. या वेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, मुंबई अध्यक्ष संजय निरुपम उपस्थित होते. मागील चार वर्षांत देशातली निर्यात घटली, बेरोजगारीत प्रचंड वाढ झाली. सत्तेवर येण्यापूर्वी ज्या घोषणा दिल्या त्या सर्वच हवेत विरल्याची टीकाही सिंघवी यांनी या वेळी केली. 

या वेळी सिंघवी म्हणाले की, देशाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कृषी क्षेत्राचा विकास दर मोठ्या प्रमाणावर घटला आहे. कॉंग्रेस आघाडीच्या काळात महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राचा विकास दर हा 4.2 टक्के इतका होता. मात्र या सरकारच्या काळात हा दर 1.9 टक्केवर आला आहे; तसेच कृषी मालाला 50 टक्के वाढीव दर देण्याची घोषणा करून अंमलबजावणी केली नाही.

Web Title: Abhishek Manu Singhvi criticizes Modi Government