वानरलिंगी सुळका अवघ्या अडीच तासांत सर 

वानरलिंगी सुळका अवघ्या अडीच तासांत सर 


अंबरनाथ : माळशेज घाटाच्या निसर्गरम्य कुशीत 400 फूट उंच प्रस्तारोहणाच्या दृष्टीने अतिशय अवघड असलेला वानरलिंगी सुळका अंबरनाथच्या स्वप्नील साळुंके आणि रोशन भोईर या दोघांनी प्रतिकूल परिस्थितीत अवघ्या अडीच तासांत सर करून सुळक्‍यावर तिरंगा फडकावला. 

वाईल्ड विंग्ज गिर्यारोहक संस्थेच्या नेतृत्वाखाली अनंत यादव यांच्या नेतृत्वाखाली स्वप्नील साळुंके आणि रोशन भोईर या धाडसी युवकांनी 14 नोव्हेंबर रोजी सकाळी वानरलिंगी सुळका सर करण्याची मोहीम आखली. सकाळी 10 वाजता मोहिमेला सुरुवात झाली आणि अडीच तासांत मोहीम पार पाडली. जमिनीपासून दोन हजार फुटांवर असलेल्या एका किल्ल्याच्या वर वानरलिंगी सुळका आहे.

 याआधी एस. सी. आय. या गिर्यारोहक संस्थेद्वारे त्यावर आरोहण करण्याकरिता बोल्ट लावण्यात आले आहेत, असे स्वप्नील साळुंके यानी सांगितले. गेल्या तीन वर्षांपासून गिर्यारोहण करण्यास सुरुवात केली. यापूर्वी लिंगाणा, तैल-बैला, डुक्‍स नोज, भैरवगड, सरसगड-वॉल यासारख्या ठिकाणी क्‍लायम्बिंग केले होते. मार्गदर्शक गणेश गिध आणि रोहित वर्तक यांनी वानरलिंगी (खडा पारसी) सुळका सर करायचा निर्धार केला होता. 

तो आनंद वेगळाच... 
वानरलिंगी (खडा पारसी) सर करण्यासाठी चार स्टेशन चढाई करायची होती. त्यातील पहिले स्टेशन नॉर्मल ग्रेडचे होते. दुसरे आणि तिसरे स्टेशन पार करायला चांगलीच कसरत करावी लागणार याची कल्पना आली, पण आता माघार नाही असे म्हणत सुमारे दोन तास 30 मिनिटांच्या चढाईनंतर सुळका सर केल्याचा आनंद काही वेगळाच, अशा शब्दांत स्वप्नील साळुंके आणि रोशन भोईर यांनी आपला आनंद व्यक्त केला. समीर चिकणे, अनंत यादव, मधुर धनावडे, श्रीधर वालम, तानाजी लाड, हरीश जाधव, अक्षय यादव, ओंकार यादव, राजू म्हसे या सहकाऱ्यांचेही या मोहिमेत सहकार्य लाभले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com