Loksabha 2019 : विदर्भात 11 वाजेपर्यंत 13.75 टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील सात मतदारसंघात झालेले मतदानाविषयी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. 

लोकसभा 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील सात मतदारसंघात आज सकाळी 7 वाजेपासून शांततेत मतदानास सुरवात झाली. सकाळी 7 ते 11 या कालावधीत सरासरी 13.75 टक्के मतदान झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

पहिल्या टप्प्यातील सात लोकसभा मतदारसंघात पुढीलप्रमाणे मतदान झाले आहे. वर्धा 15.76%, रामटेक (अ.जा.) 9.82%, नागपूर 17.56%, भंडारा-गोंदिया 12.2%, गडचिरोली-चिमूर (अ.ज.) 18.01%, चंद्रपूर 10.86% आणि यवतमाळ-वाशिम 12.06% असे मतदान झाले.

विदर्भातील 7 लोकसभा मतदारसंघात सुरु असलेल्या मतदानावेळी अनेक मतदान केंद्रावर ईव्हीएम बिघाडाबाबत 39 तक्रारी आल्या आहेत.
प्रदेश काँग्रेसच्या वॉर रुमने यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे ईमेलद्वारे तक्रार दाखल केली आहे.

  • वर्धा - 6
  • रामटेक - 5
  • नागपूर - 12
  • यवतमाळ-वाशिम - 4
  • चंद्रपूर - 8
  • गडचिरोली - 4

या लोकसभा मतदारसंघातून EVM बिघाडाबाबत तक्रारी आल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: above 13 percent voting for loksabha election till 11 pm in Vidarbha