सर्व दुचाकींना एबीएस यंत्रणा लावणे अनिवार्य

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

मुंबई : राज्यातील सर्व दुचाकी कंपन्यांच्या नवीन वाहनांना एप्रिल 2018 पासून अँटिलॉक ब्रेकिंग यंत्रणा (एबीएस) लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. हा नियम विभागीय परिवहन कार्यालयांमार्फत नोंदणीकृत कंपन्यांसाठी लागू करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त सर्व दुचाकी वाहनांनाही येत्या आर्थिक वर्षात ही यंत्रणा बसवणे अनिवार्य करण्यात येणार आहे. 

रस्त्यावर मोठ्या प्रमाणात होणारे दुचाकी वाहनांचे अपघात टाळण्यासाठी रस्ते परिवहन व राजमार्ग मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी 16 मार्च रोजी दुचाकी वाहनांना एबीएस अथवा कम्बाईंड ब्रेकिंग यंत्रणा (सीबीएस) लावण्याच्या सूचना मंत्रालयातून देण्यात आल्या होत्या. व्यावसायिक वाहनांच्या फिटनेस प्रमाणपत्रासाठी परिवहन कार्यालयात जावे लागते; मात्र दुचाकींसाठी जावे लागत नाही. नवीन दुचाकींना एबीएस यंत्रणा बसवली आहे का, हे तपासण्यासाठी सर्व परिवहन विभागांना आदेश देण्यात आले आहेत. 

एबीएस व सीबीएस म्हणजे काय? 

अँटिलॉक ब्रेकिंग यंत्रणेमुळे घसरणाऱ्या रस्त्यावर अपघात टाळणे शक्‍य होते. जर रस्ता ओला असेल किंवा घसरण्याची शक्‍यता अधिक असेल, तेथे अचानक ब्रेक लावल्यास किंवा ब्रेक लॉक झाल्यास अथवा गाडी उलटल्यास ही यंत्रणा अपघात टाळण्यास मदत करते. 

कम्बाईंड ब्रेकिंग यंत्रणा ब्रेक लावल्यावर पुढील व मागील चाकावरील दाब समान करते. या यंत्रणेसाठी चालकाला अधिक पैसे मोजावे लागतील. डिस्क ब्रेक असलेल्या दुचाकीला एबीएस यंत्रणा लावण्यासाठी 500 ते 600 रुपये खर्च येईल; तर विनाडिस्क ब्रेकच्या दुचाकीला सहा रुपये खर्च अपेक्षित आहे. 

Web Title: ABS technology Compulsary for all two wheeler