अबू आझमींना धमकी देणारा ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 एप्रिल 2017

मुंबई - समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना दूरध्वनीवरून धमकावणाऱ्या व्यक्तीस कुलाबा पोलिसांनी नुकतेच लातूर येथून ताब्यात घेतले. सुधीर नंदनर असे त्याचे नाव आहे. मानसिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या सुधीरने डिरेक्‍टरीमधून आझमींचा नंबर मिळवत त्यांना फोनवरून धमकी दिली होती.

काही दिवसांपूर्वी आझमी यांना एक फोन केला. आझमींचे स्वीय सहायक कमाल हुसैन यांनी तो उचलला. फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीने "आझमी किधर है, उसको बोलना ठोक दूंगा,' अशी धमकी दिली. हुसैन यांनी त्या व्यक्तीने नाव विचारले असता, "उसको बोलना सिर्फ ठोक दूंगा. उसको पता चल जाएगा कौन है,' असे उत्तर मिळाले. त्या वेळी अबू आझमी मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. असे चार ते पाच फोन आल्यानंतर हुसैन यांनी कुलाबा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

लातूरमधून ही धमकी देण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले. त्यानुसार तपास करत पोलिसांनी सुधीरला ताब्यात घेतले.

Web Title: Abu Azmi threatens possession