अबू सालेमला पॅरोल नाही

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

मुंबई - निकाह करण्यासाठी 456 दिवसांची पॅरोल रजा मंजूर करावी, यासाठी गुंड अबू सालेमने केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली. 25 वर्षांपूर्वी झालेल्या मुंबईत झालेल्या बॉंबस्फोटाच्या खटल्यात सालेमला "टाडा' न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याला मुंब्रा येथे राहणाऱ्या एका मुलीशी निकाह करायचा आहे. रजिस्टर पद्धतीने निकाह करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी त्याने याचिकेद्वारे केली होती. या याचिकेवर प्रभारी मुख्य न्या. व्ही. के. ताहिलरामानी आणि न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

दहशतवादासंदर्भातील आरोपांमध्ये सालेम दोषी असल्यामुळे त्याला पॅरोल मंजूर करता येणार नाही, असे मत न्यायालयाने नोंदवले.

Web Title: Abu Salem No Parol High Court