अबू सालेमची "संजू'च्या निर्मात्यांना नोटीस 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जुलै 2018

मुंबई  - अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित "संजू' सिनेमामधील तपशिलाबाबत कुख्यात गुंड अबू सालेमने या चित्रपटाचे निर्माते राजकुमार हिरानी, विधू विनोद चोप्रा यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. 

मुंबई  - अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित "संजू' सिनेमामधील तपशिलाबाबत कुख्यात गुंड अबू सालेमने या चित्रपटाचे निर्माते राजकुमार हिरानी, विधू विनोद चोप्रा यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. 

मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात सालेम आणि संजय दत्तला टाडा न्यायालयाने दोषी ठरवले आहे. संजयकडे सापडलेली एके 46 रायफल सालेमने त्याच्याकडे पोचवली होती, असा आरोप त्यांच्यावर सीबीआयने ठेवला होता. "संजू'मध्ये याबाबतची काही दृश्‍ये आहेत, मात्र हा धांदात खोटा तपशील आहे. मी कोणतेही शस्त्र संजय दत्तकडे दिले नव्हते. याबाबत टाडा न्यायालयातही पुरावे दाखल केले आहेत, असा दावा सालेमने या नोटिशीत केला आहे. सालेमने वकील प्रशांत पांडे यांच्यामार्फत ही नोटीस पाठवली आहे. सालेम सध्या तुरुंगात असून त्याच्याविरोधात अनेक खटले प्रलंबित आहेत. 

Web Title: Abu Salem notice to sanju movie Producer