esakal | अंगणवाड्यांमध्ये गैरव्यवहार
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

अंगणवाड्यांमध्ये गैरव्यवहार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मोखाडा : पालघर (Palghar) जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित महिला व बाल विकास सभापती गुलाब राऊत (Gulab Raut) यांनी पदभार स्वीकारताच जव्हार तालुक्यातील पिंपळशेत (Pimpalshet) खरोंडा ग्रामपंचायत क्षेत्रातील अंगणवाड्यांचा पाहणी दौरा केला. या वेळी अंगणवाड्यांत आर्थिक गैरव्यवहार (Financial malpractice) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे राऊत (Raut) यांनी ग्रामसेवक आणि सरपंचावर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम पिंपळशेत खरोंडा ग्रामपंचायत क्षेत्रात पिंपळशेत, कोतीमाळ अशी दोन महसूल गावे असून १३ पाडे आहेत. एकूण सात अंगणवाडी केंद्रे; तर सात मिनी अंगणवाड्या अशा एकूण १४ अंगणवाड्या असून त्यामध्ये ६०३ मुले शिक्षण घेत आहेत. अंगणवाडीतील मुलांना गणवेश, बूट, शालेय बॅग, दप्तर आदी साहित्य देणे शासनाच्या धोरणानुसार बंधनकारक आहे; मात्र येथील ग्रामसेवकाने लोकप्रतिनिधींशी संगनमत करून हे सर्व साहित्य केवळ कागदोपत्री दिल्याचे दाखवले असल्याचे महिला व बाल विकास सभापती गुलाब राऊत यांच्या भेटीदरम्यान समोर आले आहे. पाच लाख ९५ हजार ८९५ रुपये एवढ्या रकमेचा घोटाळा केल्याचे गुलाब राऊत यांनी चव्हाट्यावर आणले आहे.

हेही वाचा: लिंकवर क्लिक करताच खात्यातून ६६ हजार लंपास, गुन्हा दाखल

पिंपळशेत खरोंडा या ग्रामपंचायत हद्दीत अंगणवाडीतील मुलांना गणवेश, दप्तर, बूट वाटप न करताच केवळ कागदोपत्री दाखवून लाखो रुपये काढले आहेत. हा खूप मोठा गैरव्यवहार आहे. त्यामुळे संबंधितांची चौकशी करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

- गुलाब राऊत, सभापती, महिला व बाल विकास समिती, जिल्हा परिषद, पालघर

loading image
go to top