
Mumbai news : एसी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड! पश्चिम रेल्वेवर एसी लोकल रद्द करण्याची नामुष्की
मुंबई : अगोदरच तापमान वाढल्याने उन्हाच्या काहिलीने घामांच्या धारांनी हैराण झालेल्या मुंबईकराना सोमवारी (ता.०५) एसी लोकलच्या तांत्रीक बिघाडामुळे मोठी गैरसोय झाली आहे. विरार-चर्चगेट जलद एसी लोकलमधील दोन डब्यातील वातानुकूलित यंत्रणा काम करत नव्हती.
त्यामुळे प्रवाशांचा श्वास कोंडला होता.परंतु,एसी लोकलमध्ये बिघाड दुरुस्त न झाल्याने अखेर चर्चगेटला एसी लोकल रद्द करण्याची नामुष्की पश्चिम रेल्वेवर आली. त्याऐवजी साधली लोकल चालविण्यात आली. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेच्या कारभावर संताप व्यक केला जात आहे.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार,सोमवारी दुपारी १२ वाजून २० मिनिटांची विरार-चर्चगेट जलद लोकलच्या दोन डब्यातील वातानुकूलित यंत्रणा बिघडली. त्यानंतर वातानुकूलित यंत्रणांमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे प्रवाशांना श्वास गुदमरात होता. प्रवाशांना सुद्धा प्रचंड उष्णतेचा त्रास होत असल्याने प्रवाशांनी यांसंदर्भात रेल्वेकडे तक्रार केली.
प्रवासी लोकलचा दरवाजा बंद असल्याने प्रवाशांना जास्त त्रास होत होता. बोरिवली या स्थानकावर येताच प्रवाशांनी पश्चिम रेल्वेकडे यांसंदर्भात तक्रार केली. त्यानंतर रेल्वेचा अभियांत्रिक पथकाने बोरीवली स्थानका येऊन बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. पण एकाच डब्यातील वातानुकूलित यंत्रणा सुरु झाली. दुसऱ्या डब्यातील वातानुकूलित यंत्रणा मात्र सुरु झाली नाही.
त्यानंतर अखेर लोकल चर्चगेट दिशेकडे रवाना करण्यात आली. चर्चगेट स्थानकांवर ही लोकल रद्द करून कारशेडमध्ये पाठविण्यात आली आहे. या घटनेमुळे चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सेवा एकामागेएक खोळंबल्या होत्या. परिणामी अनेक जलद लोकल सेवा १० ते १५ मिनिटे उशिराने धावल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.
उन्हाळाच्या हिट असल्याने उकाडा खूपच वाढलेला आहे.त्यामुळे प्रवासी तिप्पटीने पैसे मोजून एसी लोकलचा प्रवास करत आहे. मात्र, पश्चिम रेल्वेचा एसी लोकलमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने एसी विना मुंबईकरांना प्रवास करावाला लागला आहे. रेल्वे प्रशासनाचा या भोंगळ कारभाराचा फटका प्रवाशांना सहन करावा लागल्याने सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे.