भरधाव टेम्पोचा अपघात; तीन जखमी

भरधाव टेम्पोचा अपघात; तीन जखमी

खोपोली : पुण्याहून मुंबईकडे मालवाहतूक करणाऱ्या भरधाव टेम्पोचा खंडाळा घाटातील प्रतिबंध मार्गावरील तीव्र उतारावर ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला. अपघातात टेम्पोमधील तीन जण जखमी झाले.
खंडाळा घाट रस्त्यावरील दस्तुरीजवळील अमृतांजन पुलावरून प्रतिबंध असलेल्या तीव्र वळण उतारावरून नियमबाह्य वाहने आणल्याने मागील महिन्याभरात पाचपेक्षाही अधिक अपघातांच्या घटना घडल्या. यात सात जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

वारंवार होत असलेल्या दुर्घटनांची दखल घेत वरिष्ठ स्तरावरून निर्देश प्राप्त झाल्यावर हा वळण रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तरीही या मार्गावरून वाहतूक सुरू असल्याचे या अपघाताच्या घटनेमुळे स्पष्ट झाले आहे. याबाबत खंडाळा घाट वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या अपघातातील तीन जखमींना निगडी येथील लोकमान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, बोरघाट महामार्ग पोलिस व खोपोली पोलिस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com