मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर आरामबस कोसळली

bus
bus

खोपोली (रायगड) : सोमवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या (बस क्रमांक एमच 04 एफ के 0201) खासगी प्रवासी आराम बसचा खंडाळा घाटातील अवघड वळणावर अपघात झाला. घाटातील अवघड चढावरून वळण घेताना ही बस पाठीमागे येऊन सुरक्षा कठड्यावर अडकली.

या अपघातात बसमधील 06 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. बाकी इतर सर्व 24 प्रवासी सुखरुप आहेत. जखमी प्रवाशांना खोपोलीतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने सदर अपघातग्रस्त बस रस्त्यालगत असलेल्या संरक्षक कठड्यात अडकली म्हणून बस खोल दरीत कोसळण्यापासून वाचली त्यामुळे  संभाव्य मोठी जिवीत हानी टळली.

अपघात घडल्यावर आयआरबी यत्रंणा, खोपोली पोलीस, महामार्ग पोलीस यांच्या टीम, खोपोली अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सक्रिय सामाजिक ग्रुपचे सदस्य घटनास्थळी तत्काळ दाखल झाल्याने वेळेवर मदत मिळाली. दरम्यान, मुंबई-पुणे महामार्गावर काही काळ वाहतुकीला अडथळा झाला होता.दोन तासांच्या अथक परिश्रमा नंतर ही अपघात ग्रस्त बस बाहेर काढण्यास यश मिळाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com