भरधाव कारने चिमुकलीला चिरडले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

कळंबोली येथे एका सोसायटीत आलेल्या अज्ञात वाहनचालकाने 5 वर्षाच्या चिमुकलीला चिरडले. सोसायटीच्या प्रवेशद्वारातून चारचाकी वाहन आत प्रवेश करीत असताना इमारतीच्या भिंतीला खेटून चाललेल्या या चिमुरडीला वाहनचालकाने वाहनसोबत फरफटत नेले. या घटनेचा व्हिडीओ देखिल सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

पनवेल : कळंबोली येथे एका सोसायटीत आलेल्या अज्ञात वाहनचालकाने 5 वर्षाच्या चिमुकलीला चिरडले. सोसायटीच्या प्रवेशद्वारातून चारचाकी वाहन आत प्रवेश करीत असताना इमारतीच्या भिंतीला खेटून चाललेल्या या चिमुरडीला वाहनचालकाने वाहनसोबत फरफटत नेले. या घटनेचा व्हिडीओ देखिल सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

कळंबोली सेक्टर 4 मधील साईनगर सोसायटीत संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. सोसायटीतील एका नातेवाईकांच्या घरी आलेल्या या पाहुण्या कारचालकाने भरधाव वाहन चालवत सोसायटीतून बाहेर चाललेल्या साक्षी सिंग या चिमुकलीला अक्षरशः चिरडून टाकले. वाहन पाहून भिंतीला खेटून बाहेर जाण्याचा प्रयत्न करणारी साक्षीच्या अंगावर वाहन घालून तिला भिंतीला घासून वाहनसोबत फरफटत नेली. थोड्यावेळाने हा प्रकार वाहनचालकाच्या लक्षात आल्यावर त्याने वाहन थांबवले. मात्र तो पर्यंत साक्षी बेशुद्ध पडली होती.

सोसायटीत नागरिकांनी धाव घेत साक्षीला कामोठे एमजीएम रुग्णालयात भरती केले. साक्षीच्या अंगावर 17 ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याचे समजते आहे. मात्र या प्रकरणी साक्षीच्या पालकांनी त्या वाहनचालाकविरोधात गुन्हा दाखल केलेला नाही. मात्र समाज माध्यमामांवर चित्रफीत व्हायरल झाल्यामुळे पोलिसांनी सुमोटो गुन्हा दाखल करण्यासाठी सूत्रे हलवल्याची माहिती कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ACCIDENT OF CHILD GIRL IN KALAMBOLI